Author: Ramchandra Bari

कर्ज देणाऱ्या अनधिकृत मोबाईल ॲपबाबत आरबीआयचा सावधानतेचा इशारा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जलद व विना अडचण कर्जे मिळण्याची खात्री देणाऱ्या अनधिकृत डिजिटल मंच किंवा  मोबाईल ॲप्सना व्यक्ती, छोटे उद्योजक वाढत्या प्रमाणावर बळी पडत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने सावधानतेचा इशारा दिला आहे. या ॲपद्वारे कर्जदारांकडून अत्याधिक व्याज दर व छुपे आकार मागविण्यात येत असून कर्ज वसुलीसाठी अस्वीकार्य व दडपशाहीच्या रीती अनुसरण्यात येत असल्याचे आणि कर्जदारांच्या मोबाईल फोन्सवरील डेटा मिळविण्यासाठी कराराचा गैरवापर केला जात असल्याचेही संदर्भ मिळत आहे. आरबीआयकडे नोंदणी केलेल्या बँका, अबँकीय वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) आणि संबधित राज्यांच्या कर्ज देण्याबाबतच्या अधिनियमासारख्या वैधानिक तरतूदीखाली राज्य सरकारकडून विनियमित केल्या गेलेल्या इतर संस्था कर्ज देण्याच्या कायदेशीर कार्यकृती करु शकतात. नागरिकांनी बेकायदेशीर कार्यकृतींना बळी पडू नये आणि ऑनलाईन, मोबाईल ॲपद्वारे कर्ज देऊ करणाऱ्या कंपन्या, संस्थांचा खरेपणा आणि पूर्वइतिहास पडताळून पाहावा. याशिवाय ग्राहकांनी त्यांच्या केवायसी कागदपत्रांच्या प्रती अज्ञात व्यक्ती, सत्यांकन  न केलेल्या अनाधिकृत ॲपवर कधीही शेअर करु नये. असे ॲप्स आणि ॲप्सशी संबंधित बँक खात्यांची माहिती संबधित कायदा  अंमलबजावणी एजन्सीला कळवावी किंवा ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी https://sachet.rbi.org.in या संकेतस्थळाचा उपयोग करावा. बँका व एनबीएफसींच्यावतीने वापरण्यात येणाऱ्या डिजिटल कर्जदायी प्लॅटफॉर्म्सनी त्यांच्या ग्राहकांना बँकाची किंवा एनबीएफसींची नावे सुरुवातीलाच सांगावीत असे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहे. रिझर्व्ह बँकेकडे पंजीकृत केलेल्या एनबीएफसींचीं नावे व पत्ते तसेच आरबीआयकडून विनियमित करण्यात आलेल्या संस्थांच्या विरुद्धच्या तक्रारी दाखल करण्यासाठी https://cms.rbi.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जयंत देशपाडे यांनी केले...

Read More

संचारबंदी कालावधीत 31 जानेवारी पर्यंत वाढ

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग तसेच अनलॉक फेजमध्ये सुधारीत सूचना व पुन्हा प्रारंभ मोहिमेंतर्गत शासनाकडील वेळोवेळी शिथिल निर्बंध व सुट मुभा देण्यात आलेल्या बाबीं संदर्भातील आदेश कायम ठेवून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्ह्यात शुक्रवार 1 जानेवारी 2021 मध्यरात्रीपासून 31 जानेवारी 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदीस मुदतवाढ दिली आहे. कोणत्याही व्यक्ती, समुह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

गृहनिर्माण सहकारी संस्थाना मालमत्तेचे मानिव अभिहस्तातरणासाठी विशेष मोहिमेचे आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : गृहनिर्माण सहकारी संस्थाना मालमत्तेचे मानिव अभिहस्तांतरण प्राप्त होण्यासाठी 1 जानेवारी 2021 ते 15 जानेवारी 2021 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील सर्व गृहनिर्माण सहकारी संस्थाचे पदाधिकारी व सभासदांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रताप पाडवी यांनी केले आहे. महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क अधिनियम 1963 मधील तरतुदीनुसार गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापन झाल्यानंतर 4 महिन्यात विकासकाने इमारतीच्या जमिनीच्या मालकी हक्क संस्थेच्या नावे हस्तातरण करुन देणे बंधनकारक आहे. मोहिमेतर्गत गृहनिर्माण सहकारी संस्थाना विकासकाकडून जमिनीचे कायदेशिर मालकी हक्क प्राप्त होणार आहे. विशेष मोहिमेंतर्गत जास्तीत जास्त गृहनिर्माण सहकारी संस्थाना लाभ घेता यावा यासाठी तालुकास्तरावर सहायक निबंधक सहकारी संस्था यांना मार्गदर्शक म्हणुन नियुक्त करण्यात आले असून जिल्हा स्तरावर मार्गदर्शनासाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात आला आहे.             अधिक माहितीसाठी तालुकास्तरावर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा. तर जिल्हास्तरावरील मार्गदर्शनासाठी सहायक निबंधक निरज चौधरी (भ्रमणध्वनी क्रमांक 9423497725) यांचेशी संपर्क...

Read More

अनोळखी मृतदेहाबाबत आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार तालुक्यातील नारायणपुर शिवारात गेटजवळ अनोळखी पुरुष मृतदेह पोटाच्या खालून अर्ध कापलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.  त्याबाबत माहिती असल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरिक्षक  उपनगर पोलीस स्टेशन नंदुरबार यांनी केले आहे. मृतदेहाची उंची 5 फुट 5 इंच, वय अंदाजे  35 वर्षे असून  शरीराने बारीक, सावळा रंग, चेहऱ्यावर सुरकत्या, डोळे बंद, तोंड अर्धवट उघडे, बारीक नाक, केस काळे आहेत.  दाढी-मिशीचे केस वाढलेली असून  अंगात फिक्कट पांढरा रंगाचा फुल बाहिचा शर्ट व  विविध ठिकाणी फाटलेली फिक्कट निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट...

Read More

टपाल विभागातर्फे विशेष मोहिम

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :- भारतीय डाक विभागांतर्गत नंदुरबार शहरातील मुख्य डाकघर व शिरपुर जि.धुळे येथील या दोन्ही ‍ठिकाणी 4 जानेवारी ते 14 जानेवारी 2021 या कालावधीत बचत खाते उघडणे, विशेष सुकन्या योजना, आधार नोंदणी व दुरूस्ती करणे, टपाल व डाक जीवन विमा, आयपीपीबी  खाते उघडणे, प्रधानमंत्री योजना इत्यादी योजनाबाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. तरी या सेवाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन धुळे विभागाचे प्रवर अधीक्षक पी.आर.सोनवणे यांनी केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!