Author: Ramchandra Bari

4 जानेवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी  सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी  जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार माहे जानेवारी महिन्यातील पहिला सोमवार 4 जानेवारी 2021 रोजी  जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे वगळून तक्रार अर्ज नियोजित दिवशी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे समक्ष उपस्थित राहून सादर करावे. जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी आपल्या समस्यांचे निरसन करण्यासाठी लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले...

Read More

लसीकरणापासून एकही बालक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या – डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात येत्या 17 जानेवारीला होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेदरम्यान एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याबाबत यंत्रणेने आवश्यक ते नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम जिल्हा कृती दल समितीची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके,  अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.व्ही.डी.सातपुते आदी उपस्थित होते.             यावेळी डॉ.भारुड म्हणाले की, जिल्ह्यातील शून्य ते पाच वयोगटातील एक लाख 92 हजार 234 बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार असल्याने मोहिमेचे आरोग्य विभागाने नियोजन करावे. प्रत्येक बालकाला पोलीओचा डोस दिला जाईल याची पर्यवेक्षीय...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!