Category: क्रीडा

जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी नोंदणी करावी – विजय रिसे

नंदुरबार (जिमाका वृत्त) – फ्रांन्स येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी नोंदणी करावी असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. वर्ष 2024 मध्ये आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा ही जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरुन होणार असून या स्पर्धेत प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्यासाठी सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालये, कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था आदि संस्थेतील उमेदवारांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.   यासाठी इच्छूक पात्र उमेदवारांनी https://Kaushalya.mahaswayam.gov.in अथवा https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर 7 जानेवारीपर्यंत नोंदणी करावी.  स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2002 व त्यानंतरचा असून आवश्यक असून याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार येथे प्रत्यक्ष अथवा  02564-295801 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क...

Read More

जी.टी.पी.ची विद्यार्थिनी रिंकी पावरा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी चीनला रवाना

नंदुरबार: (प्रतिनिधी) येथील जी.टी.पाटील महाविद्यालयातील क्रीडा विभागाची विद्यार्थिनी रिंकी पावरा हिची नुकतीच विद्यापीठाच्या माध्यामातून आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झालेली आहे. तिच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.रिंकी पावरा ही मूळची धडगाव तालुक्यातील अति दुर्गम भागातील खेड्यातील विद्यार्थिनी आहे. ती सध्या जी. टी. पाटील महाविद्यालयात शिकत असून तिने महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडा संचालक डॉ. टी. एल. दास यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग नोंदविला. रिंकी पावरा हिची आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत निवड होण्यापूर्वी अश्वमेध विद्यापीठ स्पर्धेत रौप्य पदक, अंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेत रौप्य पदक, अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत रजत पदक तसेच खेलो...

Read More

क्रीडा विषयक अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावे- सुनंदा पाटील

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत व्यायामशाळा विकास योजना, क्रीडांगण विकास योजना, युवक कल्याण योजना अशा क्रीडा विषयक अनुदान योजना राबविण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. व्यायामशाळा विकास योजनेतंर्गत नवीन व्यायामशाळा बांधकाम करणे, व्यायामशाळा इमारत नूतनीकरण (15 वर्ष जूनी असल्यास), व्यायामशाळा साहित्य खरेदी व खुले व्यायामशाळा साहित्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळा, आश्रमशाळा, अनुदानीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व शासकीय कार्यालयानी प्रस्ताव सादर करावे.यासाठी कमाल 7 लाख इतके अनुदान मंजूर करण्यात येते. क्रीडांगण विकास योजनेतंर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, 200 ते 400 मीटर धावनपथ तयार करणे, क्रीडांगणास भिंतीचे, तारेचे कुंपण घालणे, विविध खेळांची एक किंवा अधिक प्रमाणात क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह, चेंजींग रुम, पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे, भांडारगृह बांधणे, फल्ड लाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर मातीचा, सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरी, आसनव्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था तयार करणे, मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिकलर यंत्रणा बसविणे, व मैदानावर रोलींगसाठी हँड मिनी रोलर खरेदी करणे इत्यादी बाबींसाठी 7 लाख रुपये कमाल मर्यादेत व क्रीडा साहित्य खरेदीसाठी 3 लक्ष अनुदान देण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी 100 टक्के अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा व शासकीय शाळांनी प्रस्ताव सादर करावे. युवक कल्याण योजनेतंर्गत ग्रामीण, नागरी भागातील नोंदणीकृत युवक मंडळांना आर्थिक सहाय्य  तसेच नोंदणीकृत युवक मंडळांना स्वंयरोजगार प्रशिक्षण शिबीरे, सामाजिक क्षेत्रात प्रशिक्षण...

Read More

सर्व सुविधांनीयुक्त इनडोअर स्टेडियमची उभारणी करावी; तालुका क्रीडा संकुलाचे काम तात्काळ सुरू करावे – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : (जिमाका वृत्तसेवा) नंदुरबार शहरात सर्व सुविधांनीयुक्त वातानुकुलीत इनडोअर स्टेडियमची निर्मिती करण्याबरोबरच तालुका क्रीडा संकुलाचे काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या आहेत.  जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पुलकित सिंह तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्यासह जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी बोलतांना मंत्री डॉ. गावित म्हणाले, मिशन संकुल अंतर्गत शासनाने जिल्हा क्रीडा संकुल या प्रकल्पास सध्याची अनुदान...

Read More

जिल्हा आरोग्य विभागातर्फे क्रिकेट सामन्यांचे आयोजन

नंदुरबार (प्रतिनिधी) – नंदुरबार जिल्हा परिषद आरोग्य विभाग विभागातर्फे जिल्हा अंतर्गत क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आरोग्य विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या मधील सुप्त गुणांना वाव मिळावा  म्हणून या स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत करण्यात आले होते .आज या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गोविंद चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप पुंड सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी अमित पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार डॉक्टर संजीव वळवी, डॉ. हरिष कोकणी व आरोग्य विभागातील अधिकारी ,व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज पहिल्या दिवशी जिल्हा कार्यालय...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

Loading

All

Latest
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!