Category: कोरोना

सानुग्रह अनुदान नामंजूर झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रार निवारण समितीकडे अपील करावे -जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘कोविड- 19’ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या जवळच्या नातेवाईकांना राज्य शासनातर्फे 50 हजार रुपयांचे सानुग्रह साहाय्य करण्यात येणार आहे. त्यासाठी विकसित केलेल्या पोर्टलवर संबंधितांच्या नातेवाईकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यातील काही अर्ज विविध कारणामुळे नामंजूर झाले असल्यास अशा प्रकरणासंदर्भात नातेवाईकानी अपील करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे. कोविड-19’ मुळे मृत झालेल्या रुग्णांच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य वितरीत करण्याबाबत mahacovid19relief.in या पोर्टलवर सानुग्रह साहाय्य प्राप्त होण्याकामी ऑनालाईन अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातील काही अर्ज विविध कारणांमुळे नामंजूर झाले असल्यास अशा सर्व प्रकरणांबाबत अर्जदाराची सानुग्रह साहाय्य मिळण्याची संधी कायम राहील. मात्र, त्यासाठी पुढील कार्यवाही करण्यासाठी शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत. यापूर्वी ऑनलाईन केलेले अर्ज काही कारणामुळे नामंजूर झाले असल्यास, अशा अर्जाबाबत पुढील कार्यवाही करीता अर्जदाराने शासनाच्या mahacovid19relief.in या संकेतस्थळावर भेट दिल्यास अर्जदारास Appeal to GRC अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारास त्याचा यापूर्वीच भरलेला अर्ज योग्य आणि विश्वसनीय आहे. असे वाटत असल्यास प्रकरणाच्या फेरतपासणीकरीता अर्जदाराने संकेतस्थळावरील Appeal to GRC या संदेशावर क्लिक करुन GRC (तक्रार निवारण समिती) कडे अपील करावे. Appeal to GRC यावर क्लिक केल्यानंतर लागलीच निवेदन ऑनलाईन तक्रार निवारण समितीकडे सादर झाल्याचा संदेश पोर्टलवर दिसेल. सदस्य सचिव तथा जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार तक्रार निवारण समितीकडे असे प्राप्त अपील प्रकरणे समक्ष सुनावणीसाठी संधी दिली जाईल. याबाबत अर्ज करताना पोर्टलवर नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश प्राप्त होईल. या संदेशात तक्रार निवारण समितीकडे समक्ष उपस्थित राहावयाची तारीख, वेळ व स्थळ नमूद असेल. त्यावेळी अर्जदारांना आवश्यक ती सर्व...

Read More

जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन 2022-2023 या वर्षासाठी 372 कोटी 89 लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. हा आराखडा मान्यतेसाठी राज्यस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे. ‘कोविड-19’ पार्श्वभूमीवर पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस खासदार डॉ. हिना गावीत, जि.प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, आमदार किशोर दराडे, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष, जिल्हा...

Read More

सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास व थुंकल्यास 200 रुपयांचा दंड

नंदुरबार, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास तसेच थुंकणाऱ्यांविरुध्द 200 रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. मात्र, हाच गुन्हा वारंवार केल्यास दंडाची रक्कम वाढत जाणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत. शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावणे, सामाजिक अंतराचे पालन न करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीं तसेच संस्था, आस्थापना विरुध्द 27 नोव्हेंबर 2021 रोजीच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब) व महाराष्ट्र कोविड-19 नियम 2020 चे कलम 3 नुसार दंडात्मक तसेच फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, नंदुरबार जिल्हा अतिदुर्गम भाग असून तेथील नागरिकांचे उत्पन्नाचे साधन सामग्रीचा व इतर बाबी विचारात घेता या आदेशातील निर्बंध कायम ठेवून दंडाची रक्कम कमी करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास पहिल्यांदा आढळल्यास 200 रुपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास 400 रुपये,  तर तिसऱ्यांदा आढळल्यास 500 रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयात, सार्वजनिक तसेच इतर ठिकाणी मास्क न वापरल्यास पहिल्यांदा आढळल्यास 200 रुपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास 400 रुपये तर तिसऱ्यांदा आढळल्यास 500 रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलिस प्रशासन, महसूल विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागांना प्राधिकृत करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन...

Read More

31 डिसेंबर व नूतन वर्ष साध्या पद्धतीने साजरा करावा – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये “ओमिक्रॉन” ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये मोठ्या तीव्रतेने पसरण्याची शक्यता असल्याने या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात एकत्र न येता 31 डिसेंबर व नूतन वर्ष  साध्या पद्धतीने साजरा करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.             कोरानाच्या अनुषंगाने 31 डिसेंबर 2021 रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व 1 जानेवारी 2022 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने घराबाहेर न पडता नववर्षांचे स्वागत घरीच साधेपणाने आणि शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन साजरा करावा. जिल्ह्यात 25 डिसेंबर पासून रात्री 9 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली असून याचे पालन सर्व नागरिकांनी करावे.             31 डिसेंबर 2021 व नूतन वर्षांच्या स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्के पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या 25 टक्के च्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी राहील. सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सामाजिक अंतराचे पालन, मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष द्यावे, तसेच सदर ठिकाणी निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. नागरीकांनी 31 डिसेंबरच्या दिवशी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे, तसेच मास्क व सॅनिटायझरचा...

Read More

विशेष लसीकरण शिबीरास नंदुरबार जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद चार दिवसात 85 हजार 768 लसवंत

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नव्याने आलेल्या ‘ओमायक्रॉन’ या विषाणूच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामीण व शहरी भागात चार दिवस विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण मोहिमेस जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या चार दिवसात 85 हजार 768 एवढ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. 8 ते 11 डिसेंबर या दरम्यान राबविलेल्या या विशेष लसीकरण शिबिरात पहिल्या दिवशी 21 हजार 986 व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेवून लसीकरणात सहभाग घेतला. यात 18 ते 44  वयोगटातील 6 हजार 767  व्यक्तींनी पहिला डोस तर 7 हजार 204 व्यक्तींनी दुसरा डोस...

Read More

एकल कलाकारांनी अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करावे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एकल कलावंताना एकरकमी कोविड दिलासा पॅकेज अंतर्गत 56 हजार कलाकारांना  प्रति कलाकार 5 हजार प्रमाणे 28 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे त्यासाठी पात्र कलाकारांनी 20 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावे. एकल कलाकाराच्या अर्थसहाय्यासाठी पात्रता व अटी : अर्जदार महाराष्ट्र राज्यातील प्रयोगात्मक कलेतील कलेवर गुजराण असणारा आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील कलाकार असावा. त्याचे महाराष्ट्र राज्यात 15 वर्षे वास्तव्य असावे, कलेच्या क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत असल्याबाबतचे पुरावे, वार्षिक उत्पन्न रुपये 48 हजारच्या कमाल मर्यादत असावे, केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृध्द कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्याच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय असणार नाही. उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बॅक खाते तपशिल, शिधापत्रिका विहीत नमुन्यातील अर्जासोबत जोडावीत. एकल कलाकाराची निवड करण्यासाठी ‍ जिल्हास्तरीय समितीमार्फतलाभार्थ्यांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवून अर्जाची छाननी समितीमार्फत करण्यात येईल.जिल्हास्तरीय समितीने  पात्र केलेल्या कलाकाराची शिफारस यादी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांना सादर करतील व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुज्ञेय अर्थसहाय्य वर्ग करतील.  योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्जाच्या नमुन्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार येथे संपर्क साधावा. असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी,‍ डी.जी.नादगांवकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

Loading

All

Latest
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!