Category: कृषी

‘प्रति थेंब अधिक पिक’ सुक्ष्म सिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत – सी.के. ठाकरे

नंदुरबार, दिनांक 19 डिसेंबर 2023 (जिमाका वृत्त) –  राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक सुक्ष्म सिंचन योजनेच्या वर्ष 2023-24 मध्ये अनुसूचित जाती व अनुसूचीत जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सी.के. ठाकरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक सुक्ष्म सिंचन योजना वर्ष सन 2023-24 साठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के व बहुभूधारकांना 45 टक्के अनुदान देण्यात येते. अनुसुचित जाती व अनुसूचीत जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा क्रांती योजने 35 टक्के व 45 टक्के पुरक अनुदान देय असल्याने पात्र असलेल्या शेतकऱ्यांना मंजुर मापदंडाच्या 90 टक्के  मर्यादेत अनुदान देण्यात येते.  वर्ष 2023-24 मध्ये जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता रुपये 12 लाख  व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी रुपये 275 लाख 61 हजार निधी शिल्लक आहे. सद्यस्थितीत महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त होणाऱ्या अनु.जाती व अनु.जमाती लाभार्थ्यांचे अर्जाचे प्रमाण कमी असल्याने अर्ज नोंदणीसाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अनुसुचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत.  अर्ज रद्द होणार नाही यासाठी अचुक माहीती भरावी. अर्ज करतांना सातबारा, 8 अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आवश्यक असून आधार प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. लाभार्थी शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा असावी व त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर असावी. नोंद नसल्यास विहीर, शेततळे याबाबत स्वयं घोषणापत्र देण्यात यावे....

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

Loading

All

Latest
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!