नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :- भारतीय डाक विभागांतर्गत नंदुरबार शहरातील मुख्य डाकघर व शिरपुर जि.धुळे येथील या दोन्ही ‍ठिकाणी 4 जानेवारी ते 14 जानेवारी 2021 या कालावधीत बचत खाते उघडणे, विशेष सुकन्या योजना, आधार नोंदणी व दुरूस्ती करणे, टपाल व डाक जीवन विमा, आयपीपीबी  खाते उघडणे, प्रधानमंत्री योजना इत्यादी योजनाबाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. तरी या सेवाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन धुळे विभागाचे प्रवर अधीक्षक पी.आर.सोनवणे यांनी केले आहे.