नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : व्हॉट्सॲपवर फासेपारधी समाज बांधवांबाबत फिरणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील आवाज जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचा नसून त्यांच्या नावाने चुकीचा संदेश दिला जात आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. असा संदेश पसरविणाऱ्याबाबत माहिती असल्यास पोलिसांना कळवावे. खोडकरपणे असे चुकीचे संदेश पसरविताना एखादी व्यक्ती आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.