नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार तालुक्यातील नारायणपुर शिवारात गेटजवळ अनोळखी पुरुष मृतदेह पोटाच्या खालून अर्ध कापलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.  त्याबाबत माहिती असल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरिक्षक  उपनगर पोलीस स्टेशन नंदुरबार यांनी केले आहे.

मृतदेहाची उंची 5 फुट 5 इंच, वय अंदाजे  35 वर्षे असून  शरीराने बारीक, सावळा रंग, चेहऱ्यावर सुरकत्या, डोळे बंद, तोंड अर्धवट उघडे, बारीक नाक, केस काळे आहेत.  दाढी-मिशीचे केस वाढलेली असून  अंगात फिक्कट पांढरा रंगाचा फुल बाहिचा शर्ट व  विविध ठिकाणी फाटलेली फिक्कट निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट  आहे.