Author: Ramchandra Bari

पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांचा नंदुरबार दौरा कार्यक्रम

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार 2 जानेवारी, 2021 रोजी सकाळी 10 वाजता नाशिक येथुन नंदुरबारकडे प्रयाण नंदुरबार येथे आगमन. सायंकाळी 8 वाजता नंदुरबार येथुन असली ता.अक्राणी कडे प्रयाण राखीव व मुक्काम. रविवार 3 जानेवारी, 2021 रोजी असली येथे राखीव व मुक्काम. सोमवार 4 जानेवारी, 2021 सकाळी 10.00 वाजता असली येथुन नंदुरबारकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता नंदुरबार येथे आगमन व दक्षता समितीच्या बैठकीस उपस्थिती (स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार) दुपारी 4.30 वाजता कोरोना आढावा स्थितीबाबत...

Read More

अल्पसंख्याक तरुणांना पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : पोलिस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सन 2020-2021 योजनेंतर्गत राज्यातील अल्पसंख्याक  समाजातील इच्छुक उमेदवारांना शासनामार्फत विनामूल्य पोलिस भरतीपूर्व  प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी निवड चाचणी बुधवार 6 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता पोलिस परेड ग्राउंड नंदुरबार येथे होणार आहे. प्रशिक्षणासाठी अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार  हा शारिरीकदृष्टीने निरोगी व 12 वी उत्तीर्ण असावा. प्रशिक्षणार्थींचे वार्षिक कौटुंबिक उत्पन 2 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे. उमेदवार हा अल्पसंख्याक मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शिख, पारसी, जैन व ज्यू या समाजातील असावा. उमेदवाराचे वय 18 ते 25 वयोगटातील असावे. पुरूष उमेदवारासाठी उंची 165 से.मी  व महिलासाठी 155 से.मी तर  पुरुषासाठी छाती 79 से.मी. फुगवून 84 से.मी. इतकी असावी. शैक्षणिक अर्हता, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयाअंतर्गत नाव नोंदणी दाखला, ओळखपत्र, आधार कार्ड, बँक खाते पासबुक इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. प्रशिक्षणाचे स्वरुप             निवड झालेल्या उमेदवांरास 2 महिने कालावधीचे प्रशिक्षण दिले जाईल. दरम्यान दररोज 3 तासांचे वर्ग प्रशिक्षण व दोन तासांचे मैदानी प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षणार्थींस प्रशिक्षणा दरम्यान 1 हजार 500 प्रती माह याप्रमाणे विद्यावेतन व गणवेश, बूट, मोजे, बनियानसाठी 1 हजार इतके एकरकमी अनुदान दिले जाईल. संस्थेमार्फत प्रशिक्षणादरम्यान मोफत चहापान व अल्पोहार देण्यात येईल. प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षण दरम्यान निवासाची व्यवस्था स्वत: करावी लागेल.             इच्छुक उमदेवारांनी 6 जानेवारी 2021 रोजी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील पोलीस परेड ग्राऊंड नंदुरबार येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले...

Read More

एक जानेवारी पासून नाशिक विभागीय माहिती कार्यालयाचे नव्या जागेत स्थलांतर

दि, 30 डिसेंबर 2020 (विमाका नाशिक): माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबईच्या अधिनस्त विभागीय माहिती कार्यालय नाशिक अश्विनी बॅरेक्स कक्ष क्र. 5 ते 8 छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रासमोर, नाशिक रोड नाशिक येथे कार्यरत होते. हे कार्यालय मीडीया सेंटर बी.डी.भालेकर मैदान, महाकवी कालिदास कलामंदिर समोरील महानगरपालिकेच्या जागेत स्थलांतरित झाले आहे. 1 जानेवारी 2021 पासून विभागीय माहिती कार्यालयाचे कामकाज नियमित सुरु होणार असल्याची माहिती, विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक रणजितसिंह राजपूत यांनी दिली आहे. नाशिक रोड येथे कार्यरत असणारे विभागीय माहिती कार्यालयाची जागा महसुल प्रबोधिनी तथा विभागीय प्रशिक्षण संस्थेच्या संकुलासाठी आरक्षित करुन देण्यात आली आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक रोड परिसरातील विभागीय माहिती कार्यालयाची जागा रिक्त करावी ,असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले होते. त्यामुळे विभागीय माहिती कार्यालय हे मीडीया सेंटर, बी.डी.भालेकर मैदानावरील इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे.   नाशिक विभागीय माहिती कार्यालयामार्फत नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव आणि नंदुरबार या पाचही जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयांमार्फत शासकीय प्रसिध्दी व संनियंत्रण केले जाते. या कार्यालयाशी कामकाज असलेल्या सर्व संबंधितांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन श्री. राजपूत यांनी केले आहे. भविष्यात या कार्यालयाशी संबंधित असलेला पत्रव्यवहार व संपर्क विभागीय माहिती कार्यालय, बी.डी. भालेकर मैदान,महाकवी कालिदास कलामंदिर समोर, नाशिक, 422001 या नवीन पत्त्यावर करावा. तसेच या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकात बदल झाले असून नवीन दूरध्वनी क्रमांक (0253) 2590956, 2590412, 2590969 असे आहेत. बदल झालेल्या नवीन दूरध्वनी क्रमांकाची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही श्री.राजपूत यांनी कळविले...

Read More

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड  यांनी  मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये 2 जानेवारी 2021 रोजी 6 वाजेपासून ते 16 जानेवारी 2021 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात...

Read More

नूतन वर्ष स्वागताच्या वेळी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साध्या पद्धतीने करावे आणि शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.             कोरानाच्या अनुषंगाने 31 डिसेंबर 2020 रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरीदेखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व 1 जानेवारी 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने घराबाहेर न पडता नववर्षांचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे.             नागरीकांनी 31 डिसेंबरच्या दिवशी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे, तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्यादृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.             नववर्षांच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. नूतन वर्षांच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाचवेळी गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे. तसेच आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतिषबाजी करु नये. ध्वनिप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच परिपत्रकानंतर 31 डिसेंबर 2020 व  नूतन वर्ष सुरु होण्याआधी नवीन काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे. नूतन वर्ष स्वागत  शांततेत व सुस्थितीत पार पाडण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!