Author: Ramchandra Bari

अल्पसंख्याक तरुणांना पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा 28 वर्ष

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : पोलिस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सन 2020-2021 योजनेंतर्गत राज्यातील अल्पसंख्याक  समाजातील इच्छुक उमेदवारांना शासनामार्फत विनामूल्य पोलिस भरतीपूर्व  प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी निवड चाचणी बुधवार 6 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता पोलिस परेड ग्राउंड नंदुरबार येथे होणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी  अल्पसंख्याक समाजातील उमेदवाराचे वय 18 ते 28  वर्षे असणे आवश्यक आहे. पात्रतेचे इतर निकष पूर्वी जाहीर केल्याप्रमाणेच असतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी कळविले आहे....

Read More

पालकमंत्र्याच्या हस्ते अनिल वसावे याला 3 लाखाची मदत

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : एव्हरेस्टवीर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आंनद बनसोडे यांच्या टिम सोबत आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलो मांजरो या शिखरावर 360 एक्स्प्लोर्सच्यावतीने चढाई करण्याकरिता  अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाटच्या अनिल वसावेची निवड झाल्याने त्याला पुढील तयारीसाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  ॲड .के.सी.पाडवी यांच्या हस्ते 3 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. अतिदुर्गम भागात राहणाऱ्या अनिलला गरीबीच्या परिस्थितीमुळे मोहिमेवर जाणे  शक्य नव्हते. ही बाबत पालकमंत्री पाडवी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने मदत देण्याबाबत आदिवासी विकास विभागाला सूचना दिल्या.  प्रकल्प कार्यालयातर्फे  न्यूक्लिअस बजेट योजनेअंतर्गत तात्काळ कार्यवाही करण्यात आली व पुढील मोहिमेसाठी आवश्यक मदत अनिलला देण्यात आली. आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलो...

Read More

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बैठक संपन्न

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परीषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार आदी उपस्थित होते. शिधापत्रिकांना आधार जोडणीचे काम मोहिमस्तरावर पूर्ण करावे. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला अन्नधान्याचा लाभ देण्यासाठी शिधापत्रिका तयार करण्याच्या कामाचे योग्य नियोजन करावे. आदिवासी बांधवांना नवीन शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी न्यूक्लिअस बजेटमधून खर्च करावा, असे ‍निर्देश ॲड.पाडवी यांनी दिले. लॉकडाऊन काळात 58 हजार नागरिकांना अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेत नव्याने समाविष्ट...

Read More

स्थलांतर रोखण्यासाठी दुर्गम भागात रोजगार निर्मितीवर भर द्या-ॲड.के.सी.पाडवी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  दुर्गम भागातून होणारे नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी कुक्कुट पालन, मत्स्यपालन, शेळीपालन अशा व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी  यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात ॲड.पाडवी यांनी मानव विकास मिशनच्या विकास कामाचा आढावा घेतला यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परीषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पांडा, मानव विकास मिशनचे नियोजन अधिकारी विजय शिंदे आदी उपस्थित होते. ॲड.पाडवी म्हणाले, दुर्गम भागात अशा व्यवसायांना चालना देण्यासाठी  आवश्यक प्रस्ताव तयार करावा. मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी मार्केटींगची सुविधा निर्माण करावी लागेल. त्यादृष्टीने ...

Read More

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर उपाययोजना करा-ॲड.के.सी.पाडवी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कठोर उपाययोजना करावी आणि कलमाडी गावात प्रत्येक घरातील नागरिकांची कोरोना चाचणी  करावी, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परीषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पांडा, जिल्हा शल्य ‍चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते. ॲड.पाडवी म्हणाले, कोरोना बाधितांची संख्या अधिक असणाऱ्या गावात संचारबंदीचे कठोरतेने पालन करावे. लग्न समारंभात मार्गदर्शक सुचनांचे पालन न करणारे आणि मास्क न...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!