Author: Ramchandra Bari

शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव 31 जानेवारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद अनुदानित, नगरपालिका शाळेतील मुख्याध्यापकांनी सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षात विविध शिष्यवृत्तीबाबतचे प्रस्ताव 31 जानेवारी 2021 पर्यंत सादर करावयाचे आहेत.  जिल्हा समाज कल्याण, जिल्हा परिषद कार्यालयामार्फत माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा फी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पाल्यांची शिष्यवृत्ती, 9 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीचे मुले व मुलींची शिष्यवृत्ती, अनुसूचित जातीच्या मुलींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती, विजाभज, विमाप्र मुलींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती, इमाव मुलींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजना तसेच इतर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मंजूर केली जाते. मुख्याध्यापकांनी यासंबंधित प्रस्ताव 31 जानेवारीपर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी.जी.नांदगावकर यांनी केले...

Read More

महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्यासाठी 11 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा)  : कृषी विभागाने महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टिने एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली असून अर्ज करण्यासाठी 11 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  महाडीबीटी पोर्टलवर अद्याप अर्ज सादर न केलेल्या शेतकऱ्यांनी कृषिविषयक योजनाचा लाभ मिळवण्यासाठी आपले अर्ज 11 जानेवारी 2021 पर्यंत https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर सादर करावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनंत पोटे यांनी केले...

Read More

ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक वापराचे दिवस निश्चित

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण ) नियम 2000 नुसार श्रोतगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष या सारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यासाठी जिल्ह्याच्या निकडीनुसार 15 दिवस सकाळी 6 वाजेपासून रात्री 12  वाजेपर्यंत सूट देण्याबाबत  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी आदेशित केले आहे.  जिल्ह्यात 2021 यावर्षात 19 फेब्रुवारी शिवजयंती, 14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे महाराष्ट्र दिन, 10, 14 आणि 19 सप्टेंबर असे गणेशोत्सावाचे तीन दिवस,  13 व 14 ऑक्टोबर नवरात्र उत्सव, 19 ऑक्टोंबर ईद-ए-मिलाद, 4 नोव्हेंबर दिवाळी, 25 डिसेंबर ख्रिसमस,  31 डिसेंबर  आणि उर्वरीत 3 दिवस राज्य शासनाच्या महत्वाच्या कार्यक्रमासाठी राखीव असतील. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार ध्वनिक्षेपकाचा आवाज ध्वनी प्रदूषण (नियम व नियंत्रण ) नियम 2000 मधील विहित मर्यादेच्या आत ठेवावा. ध्वनीक्षेपण रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत करता येईल. कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता आयोजकांनी घ्यावी. ध्वनीक्षेपकाचा वापर करताना आक्षेपार्ह ध्वनीक्षेपण करु नये, तसेच कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. ध्वनीक्षेपकाची ध्वनीमर्यादा ही 45 डेसीबल पेक्षा जास्त असणार नाही याची दक्षता घ्यावी.  महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) मधील तरतुदीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.             ध्वनीक्षेपनाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास ध्वनीक्षेपण परवानगी कोणतीही पुर्वसूचना न देता रद्द करणेत येईल. ध्वनीक्षेपण परवानगीत बदल करण्याचा अगर परवानगीत रद्द करण्याचा अधिकार जिल्हादंडाधिकारी नंदुरबार यांनी राखून ठेवले आहे. तसेच कोविड-19 विषाणुंचा प्रसार व प्रादुर्भाव होऊ नये याकरिता जिल्हा प्राधिकरणाने उपाययोजनेचा एक भाग म्हणून...

Read More

नायलॉन मांजाची विक्री व वापरास प्रतिबंध

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : मकर संक्राती सणाच्या वेळी प्लास्टिक  किंवा कृत्रिम वस्तूचा वापर करून बनविण्यात आलेल्या नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व हाताळणी करण्यास  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 अन्वये प्रतिबंध केला आहे. नायलॉन मांजामुळे पक्षी व मानव जिवितांस इजा होते. काही प्रसंगी त्या इजा प्राणघातक ठरतात.  मकरसंक्राती सणाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर पतंग उडविण्याचा खेळ खेळला जातो. पतंगासह तुटलेले नायलॉन मांजाच्या धाग्यांचे तुकडे जमिनीवर पडतात नायलॉन मांजाचे तुकडे हे लवकर विघटन होण्याजोगे नसल्याने गटारे व नदी-नाल्यासारख्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात. तसेच नायलॉन  मांजाचे तुकड्यामुळे गाय अथवा तत्सम प्राण्यांनी नायलॉन मांजाचे तुकडे समाविष्ट असलेले खाद्य सेवन केल्यामुळे त्यांना गुदमरण्याचा त्रास होतो. अशा धाग्यांमधील प्लास्टिकच्या वस्तुंमुळे विविध प्रकारचे दुष्परिणाम होतात. माती व पाण्याच्या गुणवत्तेची पातळी घसरते. नायलॉन मांजाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन अशा धाग्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, तसेच साठवणुकदार यांनी तत्परतेने नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक थांबवावी. वर्षभरात त्यांची साठवणूक, हाताळणी व विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. पतंग उडवितांना केलेल्या माजांच्या वापरामुळे विजेच्या तारांवर घर्षण होऊन आग लागणे, उपकेंद्र  बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जीवीत हानी होणे अशा घटना घडण्याची शक्यता असल्याने, याबाबतची आवश्यक ती खबरदारी घ्यावी असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!