Author: Ramchandra Bari
पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वेळेत बदल
Posted by Ramchandra Bari | Jan 8, 2021 | आरोग्य |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : पशुपालकांच्यादृष्टीने पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वेळा ह्या गैरसोयीच्या होत असल्याने 7 जानेवारी पासून राज्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी-1 श्रेणी-2, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, तसेच फिरते पशुवैद्यकीय दवाखाने दोन सत्राऐवजी सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत ( जेवणाची सुट्टी दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंत) आणि शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहतील. आकस्मिक प्रसंगी 24 तास पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहे. पशुपालकांनी याची नोंद घ्यावी असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नंदुरबार यांनी कळविले...
Read Moreवाहनावर राजकीय पक्षाचे चिन्ह वापरल्यास कारवाई
Posted by Ramchandra Bari | Jan 8, 2021 | निवडणूक |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात 87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम सुरू असल्याने आचारसंहिता कालावधीत वाहनावर राजकीय पक्षाचे चिन्ह, झेंडा, शासकीय लोगो इत्यादिंचा वापर करून फिरणाऱ्या वाहनावर आणि संबंधित वाहन धारकांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाला दिले आहेत. आचारसंहिता कालावधीत वाहन धारकांनी आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहनदेखील करण्यात आले...
Read Moreजिल्ह्यासाठी स्थानिक सुट्टया जाहीर
Posted by Ramchandra Bari | Jan 7, 2021 | शासकीय |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी सन 2021 या वर्षाकरीता तीन दिवस स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत. आषाढी एकादशी मंगळवार 20 जुलै , विश्व आदिवासी दिवस सोमवार 9 ऑगस्ट तसेच घटस्थापना गुरुवार 7 ऑक्टोबर असे तीन दिवस जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना (न्यायालयीन विभाग वगळून ) सुट्टी असणार...
Read More