Author: Ramchandra Bari

रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : रब्बी हंगाम 2021 साठी गहू, हरभरा व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली असून योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. गहू पिकासाठी प्रति हेक्टरी 37 हजार 500 विमा संरक्षित असून शेतकऱ्यांना 563 रुपये प्रती हेक्टर , हरभरा पिकासाठी प्रति हेक्टरी 35 हजार विमा संरक्षित असून शेतकऱ्यांना 525 रुपये प्रती हेक्टर तर  उन्हाळी भुईमूगसाठी प्रति हेक्टरी 40 हजार विमा संरक्षित असून शेतकऱ्यांना 600 रुपये प्रती हेक्टर इतका विमा हिस्सा शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे. गहुसाठी व हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर 2021 तर उन्हाळी भुईमूगसाठी 31 मार्च 2022 पर्यंत पिकविम्याची रक्कम भरावयाची आहे. योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे, रब्बी हंगामासाठी नैसर्गीक आपत्ती किड आणि रोग, स्थानिक नैसर्गीक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीस संरक्षण तसेच पिक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनास येणारी घट, जसे नैसर्गीक, आग, विज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पुर, भुसखलन, दुष्काळ यांना संरक्षण देय आहे. तसेच पीक काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचीत पिकांचे काढणीनंतर दोन आठवड्याच्या आत गारपीट, चक्रीवादळ , बिगर मोसमी पाऊस इत्यादी मुळे नुकसान झाल्यास वैयक्तिकस्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाणार आहे. रब्बी हंगामासाठी जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.मुंबई या कंपनीची निवड केली असून योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी नैसर्गीक आपत्तीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानीबाबत विमा कंपनी किंवा टोल फ्री क्रमांक 18001024088 वर संपर्क करावा. योजनेत सहभागी होण्यासाठी कृषि विभाग, व...

Read More

विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक 13 डिसेंबर, 2021 रोजी : उपआयुक्त (महसुल) रमेश काळे

नाशिक (विमाका वृत्तसेवा):विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक 13 डिसेंबर, 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता  विभागीय आयुक्त  राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे, असे विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य सचिव तथा उपआयुक्त (महसुल) रमेश काळे यांनी कळविले आहे.  ज्या नागरिकांना आपले तक्रार अर्ज सादर करावयाचे असतील त्यांनी बैठकीच्या दिवशी समक्ष सादर करावे किंवा पोस्टाने कार्यालयात सादर करण्याचे आवाहनही उपआयुक्त (महसुल) रमेश काळे यांनी केले...

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  यावेळी उपजिल्हाधिकारी कल्पना निळ-ठुबे, नायब तहसिलदार रामजी राठोड, राजेंद्र चौधरी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित...

Read More

राष्ट्रीय लोकअदालतीचे 11 डिसेंबर रोजी आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, नंदुरबार व तालुकास्तरावर शनिवार 11 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयेाजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सर्व प्रकारचे दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात दावे, कौटुंबिक हिंसाचार, चलनक्षम दस्तऐवज प्रकरणे, किरकोळ स्वरुपाची दिवाणी प्रकरणे, भूसंपादनाशी संबंधित असणारी प्रलंबित प्रकरणे या अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहे. तर दाखलपुर्वक प्रकरणांमध्ये सर्व प्रकारचे तडजोडक्षम प्रकरणे, उदा. बँक कर्ज, पाणीपट्टी, दूरध्वनीदेयक, वीजबिल इत्यादी थकबाकी वसुलीची प्रकरणे ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांनी त्यांच्या अखत्यारीतील थकबाकी बाबतची दाखलपूर्वक प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवावयाची असल्यास जिल्ह्यातील कार्यालयांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार येथे, तर  तालुकास्तरावरील कार्यालयांनी तालुका विधी सेवा समितीकडे संपर्क साधावा.  जास्तीत जास्त नागरिकांनी राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डि.व्ही. हरणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!