Author: Ramchandra Bari

नंदुरबारच्या सुपुत्राचा ठाण्यात गौरव खान्देशरत्न भास्कराचार्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

नंदुरबार (प्रतिनिधी) :- मूळचे नंदुरबार येथील रहिवासी व सध्या ठाणे येथे कार्यरत असलेले खान्देशचे सुपुत्र श्री राजेन्द्र शिंदे यांचा खान्देशरत्न भास्कराचार्य आदर्श शिक्षक पुरस्काराने ठाणे येथे सन्मान करण्यात आला. पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिवंडी या विद्यालयातील शिक्षक श्री.राजेंद्र एस.शिंदे, श्री.व्ही.एस.बिरारी, श्री.बी.के.ह्याळीस, श्री.एन.बी.पाटील यांचा केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री ना.कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री.मंगेश चव्हाण ,आमदार चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ यांचे हस्ते खान्देशरत्न भास्कराचार्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.मूळचे नंदुरबार येथील रहिवासी असलेले श्री राजेंद्र शिंदे हे जिटीपी महाविद्यालयाचे विद्यार्थी असून, एनसीसी च्या युनिटचे ते अंडर ऑफिसर होते.आर.एस.पी. ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक श्री. राजेंद्र एस.शिंदे, कल्याण...

Read More

यावर्षी सारंगखेडा यात्रा होणार नाही

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सारंगखेडा यात्रा होणार नाही. परंतु कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करून घोडेबाजार 18 ते 27 डिसेंबर, 2021 या कालावधीत भरविण्यास परवानगी असेल. अशी माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे. सारंगखेडा यात्रेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार मंदार कुलकर्णी आदी उपस्थित होते.  यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, श्रीदत्त जयंतीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने कोरोना मार्गदर्शक सुचनांचे पालन करून आवश्यक व्यवस्था करावी, शासनाने जाहीर केलेल्या निर्देशानुसार यावर्षी सारंगखेडा यात्रा होणार नाही. पालखी सोहळ्यात भाविकांची संख्या मर्यादीत राहील, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मास्क परिधान करणे, शारिरीक अंतराचे पालन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे आणि हात वारंवार धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. मंदिरात पारंपरिक विधी आणि भाविकांचे दर्शन सुरू राहील. मंदिर परिसरात केवळ 50 व्यक्तींना एकावेळी प्रवेश द्यावा. दर्शनासाठी इतर भाविकांना टप्प्याटप्प्याने तेथे आणण्याची व्यवस्था करावी. भाविकांना योग्य रांगेत उभे रहाण्यासाठी खूणा करण्यात याव्यात. यात्रेवेळी येणारे भाविक, व्यक्तींचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे. मंदिराच्या परिसरात व घोडेबाजार परिसरात स्वयंसेवक व सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावण्यात यावेत. मंदिर प्रशासनाने सायं 7.00 वाजेपर्यंत दर्शनाची व्यवस्था करण्यात यावी. आरोग्य विभागाने मंदिर परिसराचे दररोज निर्जंतुकीकरण करावे आणि थर्मल स्कॅनरची व्यवस्था करावी. ग्रामपंचायतीने  ठिकठिकाणी साबणाने हात धुण्याची व्यवस्था करावी. फुले आणि नारळाच्या दुकानांची संख्या फक्त 5 ठेवावी व अशा दुकानांची माहिती पोलीसांना द्यावी. मंदिर परिसरात...

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शक सूचनाचे पालन करावे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर 2021 रोजीचा 65 व्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम कोविडच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनाचे पालन करावे असे आवाहन जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.             यावर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर 2021 रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा  कार्यक्रम कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेवून साध्या पद्धतीने  व लोकांनी एकत्रित न येता आयोजित करावा. महापरिनिर्वाण दिन हा दिवस भारतीयांसाठी दु:खाचा, गांभिर्याने पालन करावयाचा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.  त्यामुळे कोविड संसर्गचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांर्भीयाने वागावे.  शासनातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायांनी चैत्यभूमी दादर येथे न जाता घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.  चैत्यभूमी, दादर मुंबई येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय मानवंदना देण्यासाठी मान्यवर उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींना कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पुर्ण झालेले असणे बंधनकारक राहील. तसेच औष्णिक पटेक्षमच्या तपासणीअंती ज्याचे शरीराचे तापमान सर्वसाधारण असेल त्यानाच कार्यक्रमास उपस्थित राहण्यास परवानगी असेल. कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा,सॅनिटायझरचा आणि सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक असेल. कोविड-19 व विशेषत्वाने ‘ओमिक्रॉन’ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनाचे व नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्यक्ष महापरिनिर्वाण दिन अभिवादन सुरु होण्याआधी नवीन काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. सदर आदेशाचे कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा...

Read More

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2021-2022 या वर्षांसाठी  राज्यस्तरीय नावीण्यपूर्ण योजना व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी  पात्र पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे. नावीण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गायी, म्हशीचे गट वाटप करणे, शेळी, मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीसाठी अर्थसाहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप करणे तसेच 25+ 3 तलंगा गट वाटपासाठी लाभार्थ्यांची निवड ऑनलाईन पध्दतीने करण्यात येईल. लाभार्थ्यांना डेअरी, पोल्ट्री  किंवा शेळीपालनापैकी ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे ती निवड करण्याची सुविधा, अर्ज व योजनांची संपूर्ण माहिती https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर तसेच अँड्रॉईड मोबाईलवर AH-MAHABMS गुगल प्ले  स्टोअरवर 4 ते 18 डिसेंबर 2021 या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कुठल्याही परिस्थितीत अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांकात बदल करू नये.  योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1962 किंवा 1800-233-0418 किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार ), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क...

Read More

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त गुणवंत कर्मचाऱ्याचा सत्कार

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज महाराष्ट्र राज्य अंपग कर्मचारी संघटनेच्या नंदुरबार शाखेतर्फे कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयातील उत्कृष्ट काम करणारे चंद्रशेखर पाटील, राजेंद्र बोरसे, रतिलाल निकम, बालकिसन ठोंबरे, दिलीप पटले, संगीता कोकणी, ज्योती पाटील, कैलास वसावे, श्रीकांत वसईकर, किशोर बोरसे, अर्जुन चौरे आदी दिव्यांग कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार  करण्यात आला.             कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भास्कर कुवर, नंदुरबार जिल्हाध्यक्ष आसिफ शेख, सचिव आनंदराव करनकाळ, उपाध्यक्ष मनोहर पाटील, कोशाध्यक्ष जुबेर...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!