नंदुरबार (प्रतिनिधी) :- मूळचे नंदुरबार येथील रहिवासी व सध्या ठाणे येथे कार्यरत असलेले खान्देशचे सुपुत्र श्री राजेन्द्र शिंदे यांचा खान्देशरत्न भास्कराचार्य आदर्श शिक्षक पुरस्काराने ठाणे येथे सन्मान करण्यात आला. पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिवंडी या विद्यालयातील शिक्षक श्री.राजेंद्र एस.शिंदे, श्री.व्ही.एस.बिरारी, श्री.बी.के.ह्याळीस, श्री.एन.बी.पाटील यांचा केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री ना.कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री.मंगेश चव्हाण ,आमदार चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ यांचे हस्ते खान्देशरत्न भास्कराचार्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
मूळचे नंदुरबार येथील रहिवासी असलेले श्री राजेंद्र शिंदे हे जिटीपी महाविद्यालयाचे विद्यार्थी असून, एनसीसी च्या युनिटचे ते अंडर ऑफिसर होते.
आर.एस.पी. ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक श्री. राजेंद्र एस.शिंदे, कल्याण तालुका कमांडर श्री मनीलाल शिंपी, भिवंडी शहर समादेशक श्री.विश्वनाथ बिरारी, भिवंडी तालुका समादेशक श्री.अकबर पिंजारी, श्री.विजय देवरे, आर.एस.पी.अधिकारी भिवंडी, आर एस पी युनिट कल्याण शहर व भिवंडी शहर यांचेकडून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री ना.कपिल पाटील यांना हेलिपॅडवर सलामी व मानवंदना देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिवंडी विद्यालयाचे प्राचार्य श्री.जी.ओ.माळी यांच्याकडुन मंत्रीमोहदयांचे हेलिपॅडवर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष श्री.विकास पाटील व उपाध्यक्ष श्री.एन.एम.भामरे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.