Author: Ramchandra Bari

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत रब्बी हंगामासाठी अनुदानित बियाण्यांचा लाभ घ्यावा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगामासाठी  हरभरा, रब्बी ज्वारी व गहू बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात आले  असून  अनुदानित बियाण्यांचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.             जिल्ह्यात हरभरा 1 हजार 318 क्विंटल, रब्बी ज्वारी 340 क्विंटल व गहु 804 क्विंटल इतके अनुदानित बिंयाण्याचे तालुका निहाय वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. 10 वर्षे आतील प्रमाणित बियाणे हरभरा फुले विक्रांत, राजविजय 202, फुले विक्रमसाठी प्रति किलो 25 रुपये अनुदान ,रब्बी ज्वारी  फुले रेवती, फुले सुचित्रा साठी प्रति किलो 30 रुपये अनुदान तसेच ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत हरभरा जॅकी 9218 साठी प्रती किलो 25 रुपये अनुदान तर गहु फुले समाधान, लोकवन व एच.डी. 2189 साठी 16 किलो प्रती अनुदान राहील. शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे महाबीज व राष्ट्रीय बिज निगम यंत्रणेकडील वितरकांमार्फत तालुकास्तरावर परमिटद्वारे वितरणाचे नियोजन करण्यात आले असून अनुदानित बियाण्याचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर  ऑनलाईन पध्दतीने अर्ज केलेले शेतकरी तसेच लक्षांकपुर्तीसाठी ऑफलाईन पध्दतीने शेतकरी निवडण्यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत कार्यवाही सुरु असुन या अनुदानित बियाण्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार यांनी  केले...

Read More

6 डिसेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी  सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी  जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 6 डिसेंबर 2021 रोजी  जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे वगळून तक्रार अर्ज सोमवार 6 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे उपस्थित राहून सादर करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले...

Read More

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ चित्रपटाचे

            नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी,  दि.६ डिसेंबर २०२१ रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या व्टिटर, फेसबुक तसेच युट्यूब या समाजमाध्यमांवर सकाळी 11 वाजता प्रसारण होणार आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय,भारत सरकार  आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांनी या चित्रपटाची निर्मिती संयुक्तरित्या केली आहे.               स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार,महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य विविध क्षेत्रातील अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी,समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी  ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ हा चित्रपट नक्की पहायला हवा.             ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भुमिका अभिनेता मामूट्टी यांनी तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखले, मृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथालेखन सोनी तारापोरेवाला, अरूण साधू, दया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले. सल्लागार श्याम बेनेगल आहेत, चित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्या, संगीत अमर हल्दीपुर, फोटोदिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे.                       6 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या  https://twitter.com/MahaDGIPR,https://www.facebook.com/MahaDGIPR, https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR या समाजमाध्यमांवर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’  हा चित्रपट नक्की पहा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात...

Read More

बालविवाह थांबविण्यास बाल संरक्षण समितीस यश

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नंदुरबार अंतर्गत जिल्हा बाल सरंक्षण कक्षाला निनावी सुचनेनूसार अल्पवयीन मुलीचा विवाह नवापूर तालुक्यातील नावली पो.मोग्राणी येथे  30 नोव्हेंबर रोजी होणार असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यावर त्वरीत कार्यवाही करुन अल्पवयीन मुलीचा विवाह  रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण समितीस यश आले आहे. प्राप्त सुचनेनूसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी, बाल संरक्षण अधिकारी संस्थात्मक गौतम वाघ, यांनी प्रत्यक्ष पालकांची भेट घेऊन त्यांना बालविवाहाचे दुष्पपरिणाम व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 याबाबत माहिती देऊन समुपदेशन केले. पालकांकडून ‘मुलगी जोपर्यंत 18 वर्ष वयाची होत नाही तोपर्यंत तिचा विवाह करणार नाही’  तसेच आवश्यकतेनुसार मुलीस समितीसमोर सादर करण्याचे हमीपत्र लिहून सदर मुलीचा बालविवाह थांबविण्यात आला. यावेळी बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य रेणूका मोघे, समुपदेशक गौरव पाटील, जन साहस संस्थेच्या समुपदेशिका अनिता गावीत, खांडबारा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भुषण बैसाणे, हे.कॉ.विश्वास गावीत,अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांनी सहकार्य...

Read More

अवसायकांचे पॅनेलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार अवसायक नियुक्तीसाठी अवसायकांचे पॅनेल (नामतालिका) तयार करण्यासाठी 14 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करावयाचे आहेत.             अवसायकांचे नामतालिकेसाठी  न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश व सेवानिवृत्त विधी अधिकारी, प्रॅक्टीसिंग वकील, चार्टंड अकॉऊन्टंट (सी.ए), इन्टिट्यूट ऑफ कॉस्ट ॲन्ड वर्कस अकॉऊन्टंट (आय.सी.डब्ल्यू ए), कंपनी सेक्रेटरी (सी.एस), तसेच राष्ट्रीयकृत ग्रामीण, भूविकास, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,व्यापारी,नागरी सहकारी बँक,राज्य सहकारी बँक याचे सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले सेवानिवृत्त अधिकारी, सहकार विभागातील सेवानिवृत्त वर्ग 1 , वर्ग 2 अधिकारी सहकार अधिकारी प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी दर्जाचे कर्मचारी,महसूल विभागातील सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी, कंपनी लिक्विडेटर म्हणून कामकाज केलेले अनुभवी व्यक्ती, सहकार संस्थेचे लेखापरीक्षण केले असल्याचे 10 वर्षांचे अनुभवी प्रमाणित लेखापरिक्षक यासाठी अर्ज करु शकतात.             अवसायकांचे नामतालिकेसाठी अर्जदाराकडे पुढील अर्हता असावी, वयोमर्यादा 70 वर्षपर्यंत असावी, शारीरीक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा. सदर अर्जदारावर कोणत्याही स्वरुपाचे गुन्हे दाखल नसावेत, शासकीय सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी असल्यास त्यांची कोणतीही खातेनिहाय चौकशी चालु नसावी, तसेच सेवेत कोणताही ठपका ठेवलेला नसावा. प्रॅक्टीसिंग वकील व चार्टंड अकॉऊन्टंट, कॉस्ट अकॉऊन्टंट,कपंनी सेक्रेटरी यांना सहकारी संस्थेतील 5 वर्षांचा अनुभव असावा.अर्जदार कोणत्याही सहकारी संस्थेचा थकबाकीदार नसावा.  तसेच सदर व्यक्तींचा सहकार खात्या काळया यादीत समावेश नसावा. सदर व्यक्ती संबंधित विभागाच्या विभागीय सहनिंबधक,सहकारी संस्था कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असावा. अर्जदार एकावेळी एकाच जिल्ह्यातून अर्ज दाखल करु शकतो. विहीत नमुन्यातील अर्ज 1 डिसेंबर 2021 ते 14 जानेवारी 2022 या कालावधीत जिल्हा उपनिंबधक,सहकारी संस्था, नंदुरबार खोली क्रमांक 228, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकरतलाव रोड,...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!