नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

यावेळी उपजिल्हाधिकारी कल्पना निळ-ठुबे, नायब तहसिलदार रामजी राठोड, राजेंद्र चौधरी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.