नाशिक (विमाका वृत्तसेवा):विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक 13 डिसेंबर, 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता  विभागीय आयुक्त  राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे, असे विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य सचिव तथा उपआयुक्त (महसुल) रमेश काळे यांनी कळविले आहे.

 ज्या नागरिकांना आपले तक्रार अर्ज सादर करावयाचे असतील त्यांनी बैठकीच्या दिवशी समक्ष सादर करावे किंवा पोस्टाने कार्यालयात सादर करण्याचे आवाहनही उपआयुक्त (महसुल) रमेश काळे यांनी केले आहे.