Author: Ramchandra Bari

पोलीस शिपाई लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची 17 डिसेंबर रोजी शारीरीक व मैदानी चाचणी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :   नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 25 पोलीस शिपाई रिक्त पदांच्या लेखी परिक्षेत पात्र ठरलेल्या 1:10 या प्रमाणकांनुसार उमेदवाराची कागदपत्र पडताळणी, शारिरीक चाचणी व मैदानी चाचणी परीक्षा 17 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 6 वाजता पोलीस मुख्यालय नंदुरबार येथे घेण्यात येणार आहे. पोलीस भरतीसाठी पात्र उमेदवाराची यादी व नमूना चाचणीकरीता आवश्यक सूचना मे.न्यास कम्युनिकेशन, प्रा.लि.मुंबई तसेच www.nandurbarpolice.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार मैदानी चाचणीकरिता विहित वेळेत उपस्थित राहणार नाहीत.त्यांच्यासाठी स्वतंत्र भरती प्रक्रिया राबविण्यात येणार नसल्याने गैरहजर राहिलेल्या उमेदवार भरती प्रक्रियेतून अपात्र ठरविण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले...

Read More

एकल कलाकारांनी अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करावे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एकल कलावंताना एकरकमी कोविड दिलासा पॅकेज अंतर्गत 56 हजार कलाकारांना  प्रति कलाकार 5 हजार प्रमाणे 28 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे त्यासाठी पात्र कलाकारांनी 20 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावे. एकल कलाकाराच्या अर्थसहाय्यासाठी पात्रता व अटी : अर्जदार महाराष्ट्र राज्यातील प्रयोगात्मक कलेतील कलेवर गुजराण असणारा आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील कलाकार असावा. त्याचे महाराष्ट्र राज्यात 15 वर्षे वास्तव्य असावे, कलेच्या क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत असल्याबाबतचे पुरावे, वार्षिक उत्पन्न रुपये 48 हजारच्या कमाल मर्यादत असावे, केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृध्द कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्याच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय असणार नाही. उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बॅक खाते तपशिल, शिधापत्रिका विहीत नमुन्यातील अर्जासोबत जोडावीत. एकल कलाकाराची निवड करण्यासाठी ‍ जिल्हास्तरीय समितीमार्फतलाभार्थ्यांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवून अर्जाची छाननी समितीमार्फत करण्यात येईल.जिल्हास्तरीय समितीने  पात्र केलेल्या कलाकाराची शिफारस यादी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांना सादर करतील व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुज्ञेय अर्थसहाय्य वर्ग करतील.  योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्जाच्या नमुन्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार येथे संपर्क साधावा. असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी,‍ डी.जी.नादगांवकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले...

Read More

नंदुरबार जिल्ह्यातील 45 हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 38 कोटींची मदत

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : अतिवृष्टी, गारपीट व पुरामुळे झालेल्या शेत पिकाच्या नुकसानी पोटी महाविकास आघाडीच्या सरकार काळात कोरोनाच्या संकटकाळात जिल्ह्यातील 45 हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना मदतीचा हात दिल्याने बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 38 कोटी रुपयापेक्षा अधिक मदतीचे वाटप करण्यात आले.  जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोंबर 2019, जून ते ऑक्टोंबर 2020 आणि  जून ते ऑक्टोंबर 2021 या कालावधीत अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे  निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे यंत्रणेमार्फत करण्यात आले. या नुकसानीची भरपाई जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मिळावी याकरिता राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी सातत्याने पाठपुरावा केला.  जुलै ते ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत 12 हजार 150 शेतकऱ्यांना 16 कोटी 52 लाख 35 हजार 406 रुपयाची मदत देण्यात आली. यात नंदुरबार तालुक्यात 4 कोटी 658 लाख 803 (2754 शेतकरी), नवापूर  53 लाख 68 हजार 290 (1135 शेतकरी), शहादा 6 कोटी 99 लाख 52 हजार 500 (3361 शेतकरी), तळोदा 2 कोटी 83 लाख 41 हजार 240 (2699 शेतकरी), अक्कलकुवा 96 लाख 34 हजार 573 (1100 शेतकरी) आणि अक्राणी तालुक्यात 54 लाख 28 हजार (1101 शेतकरी)  अशा एकूण 12 हजार 150 कोरडवाहू  व बागातदार शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले. जून ते ऑक्टोंबर 2020 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत 24 हजार 839 शेतकऱ्यांना 15 कोटी 97 लाख 34 हजार 914 रुपयांची मदत देण्यात आली. नंदुरबार तालुक्यात 59...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!