Author: Ramchandra Bari

विशेष लसीकरण शिबीरास नंदुरबार जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद चार दिवसात 85 हजार 768 लसवंत

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नव्याने आलेल्या ‘ओमायक्रॉन’ या विषाणूच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामीण व शहरी भागात चार दिवस विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण मोहिमेस जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या चार दिवसात 85 हजार 768 एवढ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. 8 ते 11 डिसेंबर या दरम्यान राबविलेल्या या विशेष लसीकरण शिबिरात पहिल्या दिवशी 21 हजार 986 व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेवून लसीकरणात सहभाग घेतला. यात 18 ते 44  वयोगटातील 6 हजार 767  व्यक्तींनी पहिला डोस तर 7 हजार 204 व्यक्तींनी दुसरा डोस...

Read More

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :   सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे सन 2021-2022 या आर्थिक वर्षांसाठी विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या समाजाला मुख्य प्रवाहात आणून भटक्या विमुक्त समाजाचे राहणीमान उंचावण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत वैयक्तिक घरकुल बांधून देण्यासाठी 30 डिसेंबर 2021 पर्यंत गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे. योजनेच्या अटी व शर्ती  पुढील प्रमाणे : लाभार्थी कुटुंब हे विमुक्त जाती , भटक्या जमाती या मूळ प्रवर्गातील तसेच गावोगावी भटकंती करुन उपजिविका करणारा असावा, लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न  एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे, लाभार्थ्याच्या कुटुंबाचे स्वत:च्या मालकीचे घर नसावे. लाभार्थी कुटुंबाचे घर  हे झोपडी, कच्चे घर असावे. लाभार्थी कुटुंब हे भूमीहिन असावे, लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात कोठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. योजनेचा लाभ पात्र कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येईल. लाभार्थी हा वर्षभरात 6 महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा. या योजनेतंर्गत एकूण 10 पात्र लाभार्थी कुंटुबासाठी जमीन उपलब्ध होत असल्यास योजनेचा लाभ देण्यात येईल. योजनेचा निधी रमाई आवास योजनेच्या धर्तीवर वैयक्तिक लाभार्थ्याना राज्य व्यवस्थापनाच्या ग्रामीण गृहनिर्माण कक्षामार्फत उपलब्ध होईल. रमाई आवास योजनेच्या धर्तीवर वैयक्तिक लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य लाभार्थ्यांला देण्यात येईल. योजनेसाठी रमाई आवास योजनेचे निकष व अटी व शर्ती लागू असतील. निधीचे वितरण जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरण यांच्या मार्फत वैयक्तिक लाभार्थ्यांना बँक खात्यात जमा करण्यात येईल. ज्या लाभार्थ्याकडे स्वत:ची जागा आहे आणि केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही आवास योजनेचा लाभ घेतला नाही त्यास...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!