Author: Ramchandra Bari
पवन ऊर्जा जमीन हक्क शेतकरी कामगार संघर्ष समितीचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण
Posted by Ramchandra Bari | Apr 8, 2022 | कृषी, व्हिडीओ |
मोदलपाडा नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
Posted by Ramchandra Bari | Apr 8, 2022 | आरोग्य, व्हिडीओ |
समता सप्ताहाअंतर्गत वकृत्त्व स्पर्धा संपन्न
Posted by Ramchandra Bari | Apr 8, 2022 | दिनविशेष, शैक्षणिक |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती जिल्ह्यात अभिनव पद्धतीने साजरी करण्यात येत असून या जयंतीनिमित्त 7 एप्रिल 2022 रोजी अनु.जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा होळ तर्फे हवेली व मुलांची शासकीय निवासी शाळा मोहीदे ता.शहादा येथे वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर हे होते. यावेळी डॉ.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. श्री. नांदगांवकर यांनी यावेळी निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेतून डॉ.बाबासाहेब आंबेडकरा विषयी आपले विचार व महत्व विषद करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरा सारखी अंगी जिद्द व कष्ट करण्याची तयारी ठेवली तर जीवनात कोणतीच गोष्ट अशक्य नाही असे सांगितले. यावेळी निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनींनी वकृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. कार्यक्रमाला कार्यालयीन अधिक्षक दिलीप कोकणी, समाज कल्याण निरीक्षक सिताराम गांगुर्डे, गृहपाल प्रदीप वसावे, गणेश देवरे तसेच समाज कल्याण विभाग व निवासी शाळेतील कर्मचारी उपस्थित होते. प्रास्तविक मुख्याध्यापिका श्रीमती बोरसे यांनी केले तर सुत्र संचालन दिनेश दिनकर यांनी केले. समता सप्ताहाअंतर्गत विद्यार्थ्यांना स्वाधार प्रमाणपत्राचे वाटप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 8 एप्रिल 2022 रोजी अनु.जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा होळ तर्फे हवेली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य एस.पी.देवरे, कार्यालयीन अधिक्षक दिलीप कोकणी, समाज कल्याण निरीक्षक सिताराम गांगुर्डे, गृहपाल प्रदीप वसावे,...
Read More