नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :   नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 25 पोलीस शिपाई रिक्त पदांच्या लेखी परिक्षेत पात्र ठरलेल्या 1:10 या प्रमाणकांनुसार उमेदवाराची कागदपत्र पडताळणी, शारिरीक चाचणी व मैदानी चाचणी परीक्षा 17 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 6 वाजता पोलीस मुख्यालय नंदुरबार येथे घेण्यात येणार आहे.

पोलीस भरतीसाठी पात्र उमेदवाराची यादी व नमूना चाचणीकरीता आवश्यक सूचना मे.न्यास कम्युनिकेशन, प्रा.लि.मुंबई तसेच www.nandurbarpolice.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार मैदानी चाचणीकरिता विहित वेळेत उपस्थित राहणार नाहीत.त्यांच्यासाठी स्वतंत्र भरती प्रक्रिया राबविण्यात येणार नसल्याने गैरहजर राहिलेल्या उमेदवार भरती प्रक्रियेतून अपात्र ठरविण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.