नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : अतिवृष्टी, गारपीट व पुरामुळे झालेल्या शेत पिकाच्या नुकसानी पोटी महाविकास आघाडीच्या सरकार काळात कोरोनाच्या संकटकाळात जिल्ह्यातील 45 हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना मदतीचा हात दिल्याने बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 38 कोटी रुपयापेक्षा अधिक मदतीचे वाटप करण्यात आले. 

जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोंबर 2019, जून ते ऑक्टोंबर 2020 आणि  जून ते ऑक्टोंबर 2021 या कालावधीत अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे  निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे यंत्रणेमार्फत करण्यात आले. या नुकसानीची भरपाई जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मिळावी याकरिता राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

 जुलै ते ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत 12 हजार 150 शेतकऱ्यांना 16 कोटी 52 लाख 35 हजार 406 रुपयाची मदत देण्यात आली. यात नंदुरबार तालुक्यात 4 कोटी 658 लाख 803 (2754 शेतकरी), नवापूर  53 लाख 68 हजार 290 (1135 शेतकरी), शहादा 6 कोटी 99 लाख 52 हजार 500 (3361 शेतकरी), तळोदा 2 कोटी 83 लाख 41 हजार 240 (2699 शेतकरी), अक्कलकुवा 96 लाख 34 हजार 573 (1100 शेतकरी) आणि अक्राणी तालुक्यात 54 लाख 28 हजार (1101 शेतकरी)  अशा एकूण 12 हजार 150 कोरडवाहू  व बागातदार शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले.

जून ते ऑक्टोंबर 2020 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत 24 हजार 839 शेतकऱ्यांना 15 कोटी 97 लाख 34 हजार 914 रुपयांची मदत देण्यात आली. नंदुरबार तालुक्यात 59 लाख 47 हजार 327 (974 शेतकरी), नवापूर 1 कोटी 59 लाख 71 हजार 200 (4842 शेतकरी ), शहादा 1 कोटी 38 लाख 97 हजार 787 (1992 शेतकरी ), तळोदा 88 लाख 53 हजार 350 (1489 शेतकरी), अक्कलकुवा 2 कोटी 65 लाख 53 हजार 400 (2838 शेतकरी ) आणि अक्राणी तालुक्यात 8 कोटी 85 लाख 11 हजार 850  (12704 शेतकरी) अशा एकूण 24 हजार 839 कोरडवाहू व बागातदार शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले.

7 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2021 या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे पीक नुकसानीबाबत पहिला हप्त्याची रक्कम 5 कोटी 58 लाख 10 हजार निधीपैकी  नंदुरबार तालुक्यात 1 कोटी 50  लाख 81  हजार 817 ( 3334 शेतकरी), नवापूर 33 हजार 609 (13 शेतकरी ), शहादा 3 कोटी 22 लाख 7 हजार 175 हजार  (3913 शेतकरी ), तळोदा 1 लाख 54 हजार 500 (29 शेतकरी), अक्कलकुवा 5 लाख 62 हजार 445 (294 शेतकरी ) आणि अक्राणी तालुक्यात 49 लाख 43 हजार 100  (920 शेतकरी) अशा एकूण 8 हजार 503 कोरडवाहू व बागातदार शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले.

मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करताना मदतीच्या रक्कमेमधुन कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करु नये असे आदेश देण्यात आले होते. प्रशासनाकडून प्राप्त झालेली मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी तालुकास्तरावर नियेाजन करण्यात आले होते.

000