Category: इतर

सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने काढला कोयता

बुलढाणा (मोहन हिवाळे – प्रतिनिधी बुलढाणा) – सोयाबीनला भाव मिळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील बाजार समितीत आलेल्या एका शेतकऱ्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे.. हातात कोयता घेऊन या शेतकऱ्याने बाजार समिती परिसरात चांगलाच राडा घातलाय.. खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अकोला येथील या शेतकऱ्याने 100 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणली होती.. मात्र या सोयाबीनला केवळ तीन हजार रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. अकोला जिल्ह्यातील पिंपळ खुटा या गावचा रवी महानकर नामक या शेतकऱ्याचा संयम सुटला असल्याचं पाहायला...

Read More

संत काशीबा गुरव युवा व जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित – एस.जी. तायडे

नंदुरबार (जिमाका वृत्त)  – महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ व जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळे नंदुरबार येथे कार्यान्वित करण्यात आली आहेत, असे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.जी. तायडे यांनी  एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकरतलाव रोड, नंदुरबार दूरध्वनी क्रमांक 02564-210062 येथे संपर्क साधावा असेही जिल्हा व्यवस्थापक श्री. तायडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले...

Read More

22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन, समस्या निवारणासाठी संपर्क साधण्याचे आवाहन – गणेश मिसाळ

नंदुरबार (जिमाका वृत्त) – प्रत्येक वर्षी 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षीचा जिल्हास्तरावरील कार्यक्रम 22 डिसेंबर 2023 रोजी तळोदा तहसिल कार्यालय येथे  सकाळी 11 वाजता होणार असल्याचे, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने सर्व कंपन्यांचे विक्री अधिकारी 22 ते 24 डिसेंबर या कालावधी उपस्थित राहणार असून ज्या ग्राहकांच्या समस्या असतील त्यांनी एचपीसी कंपनीचे विक्री अधिकारी सागर चव्हाण भ्रमणध्वनी क्रमांक 7709240437 व ईमेल [email protected] , आयओसी कंपनीचे विरेंद्र अहिरवार भ्रमणध्वनी क्रमांक 8010791969 व ईमेल [email protected]   तसेच बीपीसी कंपनीचे पवन भारती भ्रमणध्वनी क्रमांक 8128682291 व ईमेल [email protected]  त्यांच्याशी संपर्क साधावे, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. मिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले...

Read More

अशासकीय संस्थांनी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत सहभागी व्हावे – र. सो. खोडे

नंदुरबार (जिमाका वृत्त) – शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत अशासकीय संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी र.सो.खोडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अशासकीय संस्था, स्थानिक शेतकरी, सरकारी साखर कारखाने यांना यंत्रसामग्री आणि इंधन या दोन्हींचा खर्च देणे प्रस्तावित असून अल्प, अत्यअल्पभूधारक, विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. योजनेचे प्रस्ताव नंदुरबार व नवापूर तालुक्यासाठी [email protected],  शहादा व तळोदा तालुक्यासाठी [email protected]  व धडगांव व अक्कलकुवा तालुक्यासाठी [email protected]  या ईमेल पत्त्यांवर  अथवा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समिती, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग, पद्मावती नगर प्लॉट नं. 17 श्रमसाफल्य् इमारत धुळे रोड, नंदुरबार  येथे  प्रस्ताव सादर करावेत. जिल्हास्तरीय समितीकडे आलेल्या प्रस्तावावर वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सूचनांच्या अनुषंगाने संबंधित संस्थांची पात्रता व क्षमता तपासून एका जलसाठ्यासाठी एका संस्थेस गाळ उपसण्यास मान्यता देण्यात येईल असेही जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. खोडे यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले...

Read More

आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी सर्वांचा समन्वय महत्त्वाचा -मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

नंदुरबार/मुंबई, दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ (जिमाका वृत्त) – राज्यात येणाऱ्या  नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती कालावधीत आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य यांचा समन्वय ठेवला जातो. याशिवाय लष्कर, नौदल, तटरक्षक दल, राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या समन्वयातून प्रत्येक आपत्तीला आपण खंबीरपणे तोंड देऊ शकतो, हे वारंवार सिद्ध केले आहे, असे मत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केले. मंत्रालय येथे मदत व पुनर्वसन विभागामार्फत आंतरराष्ट्रीय आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त  आयोजित कार्यक्रमात मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील बोलत होते.यावेळी मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव डॉ.सोनिया सेठी, आपत्ती व्यवस्थापन संचालक अप्पासाहेब धुळाज, तटरक्षक दलाचे महासंचालक...

Read More

पोलीस अधिक्षकांची मनोज जैन यांचेकडे सदिच्छा भेट

नंदुरबार (प्रतिनिधी) :- जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पी. आर. पाटील यांनी शहरातील एम एल टाऊन परिसरातील गणेश मंडळाला भेट देऊन श्री गणेशाची आरती केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पी. आर. पाटील यांचे परिसरातील रहिवाश्यांनी शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी प्रख्यात व्यापारी श्री मनोज जैन यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणेशोत्सव बाबत व सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा केली. यावेळी नगरसेवक मनीष बाफना यांनी एम.एल. टाऊन परिसरातील गणेशोत्सवा बाबत माहिती...

Read More

अल्पसंख्याक कल्याणासाठी जिल्हास्तरीय समितीसाठी नांवे पाठवावित – सुधीर खांदे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) – अल्पसंख्याक कल्याणासाठी प्रधानमंत्री नवीन 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीची पुनर्रचना करावयाची असून ग्रामीण व नागरी क्षेत्रातील अल्पसंख्याक कल्याणाशी संबंधित स्थानिक पंचायतराज संस्थांचे प्रतिनिधी, तसेच जिल्ह्यातील अल्पसंख्यांकासाठी काम करणाऱ्या 3 नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांची नांवे 9 ऑक्टोंबर 2023 सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

Loading
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!