नंदुरबार (प्रतिनिधी) :- जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पी. आर. पाटील यांनी शहरातील एम एल टाऊन परिसरातील गणेश मंडळाला भेट देऊन श्री गणेशाची आरती केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पी. आर. पाटील यांचे परिसरातील रहिवाश्यांनी शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी प्रख्यात व्यापारी श्री मनोज जैन यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणेशोत्सव बाबत व सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा केली. यावेळी नगरसेवक मनीष बाफना यांनी एम.एल. टाऊन परिसरातील गणेशोत्सवा बाबत माहिती दिली.