शहादा (प्रतिनिधी) :- येथील अहिर सुवर्णकार मंडळाचा रौप्य महोत्सवी गुणगौरव समारंभ जन्मबंध चे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर मोरे (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलनाने प्रारंभ झाला. या प्रसंगी अहमदाबाद अ. सु. मंडळाचे ट्रस्टी चेअरमन व सुप्रसिद्ध उद्योजक श्री. संजय बागुल, श्री. प्रभाकर मोरे, अमळनेरचे विख्यात बिल्डर व शिक्षण संस्थाचालक श्री. रामदास निकुंभ, शहादा अहिर सुवर्णकार मंडळाचे अध्यक्ष प्रा. जीवन जगदाळे, सचिव श्री ज्ञानेश विसपुते यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मंडळाच्या नोंदणीस 25 वर्षे पुर्ण झाल्याने ‘सुवर्ण शलाका’ ही विशेष स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. ह.भ.प. भालचंद्र दुसाणे (पिंपळनेर), उद्योजक श्री.शशिकांत विसपुते (अंकलेश्वर) , अ.सु.शहादा संस्थापक अध्यक्ष मधुकर विसपुते, अध्यक्ष प्रा. जीवन जगदाळे, श्री. बापु विसपुते (अहमदाबाद), उपाध्यक्ष श्री. विजय वडनेरे, श्री. रघुनंदन अहिरराव (सुरत), श्री. मोहन जगताप (खेतिया), श्री. दिलीप वाघ (पानसेमल) , श्री. राजेंद्र जाधव (नंदुरबार), श्री. जगदिश सराफ (पाचोरा), राजेंद्र बागुल, विवेक विभांडिक, प्रकाश घोडके (अहमदाबाद), प्रा.रवींद्र दुसाने (अहमदाबाद), मदन सराफ, संजय विसपुते, जयंतलाल वानखेडे, रमेश निकुंभ (अमळनेर) , मनोज घोडके (धुळे), प्रदिप बिरारी , संजय विसपुते ( धुळे) ,वसंत मुरलीधर सराफ (पाचोरा), पुरुषोत्तम विसपुते व सुरेश जाधव (नंदुरबार) चंद्रकांत भामरे (नवापूर), गोपाल अहिरराव (सुरत) , सुरेश मोरे (अहमदाबाद), दीपक पाटणकर (भरुच), जगन्नाथ सोनवणे (सुरत), डॉ. लक्ष्मण विसपुते (उल्हासनगर ) प्रा. नरेंद्र विभांडिक (धडगांव) व समाजबंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्ष प्रा. जीवन जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. ह.भ.प.भालचंद्र दुसाने , श्री. शशिकांत विसपुते, रामदास निकुंभ आदींनी मनोगत व्यक्त केले. सुरुची भोजनानंतर ज्येष्ठ नागरिक, देणगीदाते, विविध पुरस्कार व पदे प्राप्तकर्ते आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगतातून श्री. प्रभाकर मोरे यांनी वाढत्या वैवाहिक वादांची कारणमिमांसा करून वर-वधूंच्या पालकांचे प्रबोधन केले. ओंकार अहिरराव, आनंदराव विसपुते, शामकांत पोतदार, रामचंद्र चव्हाण, प्रकाश चव्हाण, प्रा. शाम सोनार, संजय विसपुते , विवेक विसपुते, मिननाथ चोपड़कर , घनश्याम जगताप, पंकज रनाळकर, योगेश सोनार, अभय वाघ, रोशन सोनार, महिला संमृद्धी मंडल, गुणीजन गौरव समिती, उपक्रम समिती, अजेंडा समिती, व वैकुंठ समितीने परिश्रम घेतले.
श्री. विष्णु जोंधळे, ज्ञानेश सोनार आणि योगेश सोनार यांनी सूत्रसंचालन केले. श्री. आनंदराव विसपुते यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सांगता झाली.