बुलढाणा (मोहन हिवाळे – प्रतिनिधी बुलढाणा) – सोयाबीनला भाव मिळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील बाजार समितीत आलेल्या एका शेतकऱ्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे.. हातात कोयता घेऊन या शेतकऱ्याने बाजार समिती परिसरात चांगलाच राडा घातलाय.. खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अकोला येथील या शेतकऱ्याने 100 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणली होती.. मात्र या सोयाबीनला केवळ तीन हजार रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. अकोला जिल्ह्यातील पिंपळ खुटा या गावचा रवी महानकर नामक या शेतकऱ्याचा संयम सुटला असल्याचं पाहायला मिळालं..