नंदुरबार (जिमाका वृत्त)  – महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ व जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळे नंदुरबार येथे कार्यान्वित करण्यात आली आहेत, असे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.जी. तायडे यांनी  एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकरतलाव रोड, नंदुरबार दूरध्वनी क्रमांक 02564-210062 येथे संपर्क साधावा असेही जिल्हा व्यवस्थापक श्री. तायडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.