नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) – अल्पसंख्याक कल्याणासाठी प्रधानमंत्री नवीन 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीची पुनर्रचना करावयाची असून ग्रामीण व नागरी क्षेत्रातील अल्पसंख्याक कल्याणाशी संबंधित स्थानिक पंचायतराज संस्थांचे प्रतिनिधी, तसेच जिल्ह्यातील अल्पसंख्यांकासाठी काम करणाऱ्या 3 नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांची नांवे 9 ऑक्टोंबर 2023 सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.