Author: Ramchandra Bari

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा युवकांनी लाभ घ्यावा – विजय चाटी

नंदुरबार 29 ऑगस्ट 2023 (जिमाका वृत्त) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी विजय चाटी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. या योजनेसाठी जिल्हा ग्रामोद्योग कार्यालयामार्फत अर्जदारास विनामुल्य ऑनलाईन अर्ज व प्राथमिक स्वरूपात एक पानी संक्षिप्त प्रकल्प अहवाल तयार करुन देण्यात येणार आहे, कर्ज मंजुरीनंतर मात्र अर्जदारास सनदी लेखापाल यांच्यामार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल स्वखर्चाने तयार करुन बँकेस सादर करावा लागेल.  या योजनेत उत्पादन उद्योग, सेवा उद्योग, कृषी पूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, वाहतुक व त्यावर आधारीत व्यवसाय, फिरते खाद्यान्न विक्री केंद्र यासारखे व्यवसाय करता येतील. या योजनेसाठी वैयक्तिक मालकी, भागीदारी, मान्यताप्राप्त बचत गट हे पात्र राहतील. रु. 20 लाखापर्यंतच्या प्रकल्पासाठी 7 वी पास व रुपये 50 लाखापर्यंतच्या प्रकल्पासाठी 10 पास अशी शैक्षणिक पात्रता राहील.  उत्पादन उद्योगासाठी रुपये 50 लाख व सेवा उद्योगासाठी रुपये 20 लाख कर्जमर्यादा राहील.  या योजनेत प्रकल्प उभारणीसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 10 टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल. सबसिडी शहरी भागासाठी ती 15 टक्के, ग्रामीण भागासाठी 25 टक्के असेल. बॅंक कर्ज शहरी भागासाठी 75 टक्के व ग्रामीण भागासाठी 65 टक्के राहील. अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक, ईतर मागासवर्ग, विमुक्त व भटक्या जमाती व अल्पसंख्याक या प्रवर्गासाठी 5 टक्के स्वगुंतवणूक, यासाठी सबसिडी 25 टक्के शहरी भागासाठी व ग्रामीण भागासाठी 35 टक्के असेल. बँक कर्ज शहरी भागासाठी 70 टक्के व ग्रामीण भागासाठी 60 टक्के राहील. अधिक माहितीसाठी विजय चाटी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महाराष्ट्र...

Read More

मध केंद्र योजनेच्या मधपाळ प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करावेत – विजय चाटी

नंदुरबार (जिमाका वृत्त) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र  योजना  सुरु असून या योजनेत पात्र व्यक्ती, संस्थांनी मोफत प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी विजय चाटी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. मध केंद्र योजनेत  मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल.  उत्पादित केलेले मध शासनाच्या हमी भावाने खरेदी करण्यात येते.   वैयक्तिक मधपाळ प्रशिक्षण घेणेसाठी अर्जदार साक्षर असावा. त्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे पात्रता धारकास अनिवार्य असेल. केंद्र चालक प्रगतशील मधपाळ योजनेसाठी मधपाळ संस्था, व्यक्तिंना प्रशिक्षण घेण्यासाठी  अर्जदार किमान 10 वी पास असावा, वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावे. अर्जदार व्यक्तींच्या नावे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेतजमीन किंवा भाडे तत्वावर शेतजमीन असावी. लाभार्थ्यांकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्र चालक मधपाळ प्रशिक्षण संस्थेसाठी संस्था नोंदणीकृत असावी. प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर 1000 चौ.फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेच्या नावे मालकीची किंवा भाडे तत्वावर 1 एकर शेतजमीन असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.  विशेष प्रशिक्षणासाठी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, सेवानिवृत्त कर्मचारी, वयोवृद्ध अशी  कोणतीही व्यक्ती रुपये 25/- प्रवेश फी भरुन पाच दिवस प्रशिक्षण घेऊ शकतील. या प्रशिक्षणाचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व योजनेच्या अधिक माहितीसाठी...

Read More

शहादा येथे वाहनचालकांसाठी मोफत नेत्र तपासणी -किरण बिडकर

नंदुरबार (जिमाका वृत्त) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जिल्ह्यातील वाहनचालकांसाठी आज 29 ऑगस्ट 2023 रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. शहादा तालुक्यातील शासकीय विश्रामगृह येथे सकाळी 10-30 ते दुपारी 1-00 वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  शहादा तालुक्यातील सर्व वाहनचालकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा व नेत्र तपासणी करुन घ्यावी असे आवाहनही श्री. बिडकर यांनी केले...

Read More

मुलभूत गरजांसाठी शासनाच्या वेगवान निर्णयांमुळे दुर्गम भागात अपेक्षापूर्तीचा उत्साह पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार (जिमाका वृत्त) : शासन सर्व नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आणि वेगवान निर्णय घेत आहे, सर्वांसाठी घरे, प्रत्येक घराला वीज, प्रत्येक कुटुंबाला शौचालय, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वयंपाकाचा गॅस, आर्थिक सक्षमता, सामाजिक सुरक्षा, परवडणारी आरोग्य सेवा यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या विविध योजनांमुळे विशेषत: दुर्गम, अतिदुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये अपेक्षापूर्तीचा उत्साह दिसून येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. ते आज धडगाव येथे ठक्कर बाप्पा सभागृहात शबरी घरकुल प्रमाणपत्र व आदेश वाटप तसेच जलजीवन मिशनच्या आढावा बैठकीत बोलत होते.  यावेळी पंचायत समिती सभापती हिराबाई पराडके, उपसभापती भाईदास अत्रे, सहाय्यक...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!