‘दिव्यांगांच्या दारी’ अभियानात 7 सप्टेंबर रोजी मेळाव्याचे आयोजन; जिल्ह्यात 19 हजार 500 दिव्यांगांची झाली नोंदणी – जिल्हाधिकारी मनीषा खत्री
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात 19 हजार 500 दिव्यांगांची नोंदणी झाली आहे, दिव्यांग कल्याण विभागामार्फत ‘दिव्यांगाच्या दारी’ अभियानात 7 सप्टेंबर 2023 रोजी दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, जिल्हाधिकारी तथा दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्ष मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. दिव्यांगाच्या दारी हे अभियान शासनाच्या राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून या अभियानाचा एक भाग म्हणून श्री. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह (नंदुरबार ) येथे 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केल्या जाणाऱ्या या मेळाव्यात महसूल, पंचायत समिती, नगरपालिका, सामाजिक न्याय विभाग, सर्व शासकीय महामंडळे, जिल्हा दिव्यांग...
Read More
