संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनीषा खत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
नंदुरबार : दिनांक 5 सप्टेंबर 2023 (जिमाका वृत्त) : जिल्हा प्रशासन संभाव्य टंचाई व दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर सतर्क असून शेतकऱ्यांनी आपले होणारे नुकासान टाळण्यासाठी ई-पीक पाहणी ॲपवर पीक-पेरा ची नोंदणी करण्याचे आवाहन करतानाच संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर चारा छावण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर थेट-भेट देवून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यांनी आज नंदुरबार तालुक्यातील रनाळे, घोटाणे, न्याहली आणि खोक्राळे गावातील शेतकऱ्यांची थेट शाताच्या बांधावर जाऊन भेट घेत त्यांच्या भावना समजून घेतल्या यावेळी परिविक्षाधिन सनदी अधिकारी अंजली शर्मा, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राकेश वाणी, उपविभागीय कृषि अधिकारी सी. के.ठाकरे, नंदुरबारचे तहसीलदार नितीन गर्जे...
Read More
