Author: Ramchandra Bari
ऊसतोड कामगारांना ओळखपत्र मिळणार -सुंदसिंग वसावे
Posted by Ramchandra Bari | Aug 24, 2023 | व्यापार उद्योग, शासकीय |
नंदुरबार (जिमाका वृत्त): जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी आपल्या संबंधित ग्रामसेवकाकडे संपर्क साधुन ग्रामपंचायतीत नोंदणी करुन विहित नमुन्यातील ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे. राज्यातील ऊसतोड कामगांराचे व त्यांच्या कुटूंबाचे जीवन अस्थीर व अत्यंत हलाखीचे असते. त्यांचे जीवन सुखकारक, राहणीमान उंचावुन त्यांना विविध कल्याणकारी योजनेचा लाभ देण्यासाठी ऊसतोड कामगाराना ओळखपत्र देण्यात येत आहेत. जे ऊसतोड कामगार मागील तीन वर्ष किंवा जास्त कालावधीपासून ऊसतोडणीचे काम करत आहेत व जे इतर नियमांची पूर्तता करत आहेत त्यांना आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी करुन ओळखपत्र प्राप्त करत येईल, असेही प्रसिध्दी पत्रकान्वये श्री. वसावे यांनी कळविले...
Read Moreवैश्विक ओळखपत्र वितरण प्रणालीद्वारे करणार दिव्यांग प्रमाणत्रांचे वितरण – सुंदसिंग वसावे
Posted by Ramchandra Bari | Aug 24, 2023 | शासकीय |
नंदुरबार (जिमाका वृत्त): वैश्विक ओळखपत्र वितरण प्रणालीद्वारे दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सर्व शासकीय जिल्हा रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये तसेच केलेले नगरपालिका व महानगरपालिकेची वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये यांच्यामार्फत वितरण वितरीत करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुंदरसिंग वसावे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी… ♿️ दिव्यांग लाभार्थीने केंद्र शासनाच्या www.swaavlambancard.gov.in या संकेतस्थळावर आपली संपूर्ण वैयक्तिक व दिव्यांगत्वाची माहिती भरून ऑनलाईन अर्ज करावेत. ♿️ दिव्यांग व्यक्तिकडे इंटरनेटची सुविधा उपलब्ध असल्यास हा अर्ज ऑनलाईन करता येतो. तसेच सुविधा केंद्रामध्ये अल्प मोबदला देवूनही भरता येईल. ♿️ अर्ज भरल्यानंतर अर्जाची पोहोच पावती प्राप्त होईल. या पावतीवर त्यांच्या जिल्ह्यातील रुग्णालयांची यादी उपलब्ध आहे. त्यानुसार अर्जदारास त्यांच्या दिव्यांगत्व प्रकारानुसार घराजवळील रुग्णालयात तपासणीसाठी जाता येईल. ♿️ ऑनलाईन अर्ज संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविदयालय यांच्या लॉगीन आयडी वर उपलब्ध आहेत. ♿️ जिल्हा शल्य चिकित्सक, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविदयालयातील अधिकारी, कर्मचारी हे या अर्जाची पडताळणी करतील. ♿️ पडताळणी केलेला ऑनलाईन अर्ज संबंधित दिव्यांगत्वाचे मुल्यांकन करणाऱ्या तज्ञाकडे पाठविला जाईल. संबंधित तज्ञ त्या दिव्यांग लाभार्थ्यांचे मुल्यांकन करून ऑनलाईन संकेतस्थळावर तो अद्ययावत करेल. ♿️ हा अर्ज संबंधित रुग्णालयाच्या दिव्यांग वैद्यकीय मंडळाकडे वर्ग होवून दिव्यांग वैद्यकीय मंडळाने दिलेले निर्देश ऑनलाईन संकेतस्थळावर अद्ययावत केल्यानंतर दिव्यांग लाभार्थ्याला वैश्विक ओळखपत्र व दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध होईल. ♿️ जिल्हा शल्य चिकित्सक अथवा अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या कार्यालयाकडून ऑनलाईन कार्यान्वित कैलेल्या वैश्विक ओळखपत्र नेमलेल्या मुद्रण पुरवठादाराकडे ऑनलाईन हस्तांतरीत केले जाईल. ते मुद्रित झाल्यानंतर वैश्विक ओळखपत्रे संबंधित...
Read More4 सप्टेंबर रोजी होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन
Posted by Ramchandra Bari | Aug 24, 2023 | दिनविशेष, शासकीय |
नंदुरबार (जिमाका वृत्त) : जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सप्टेंबर महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार 4 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे वगळून तक्रार अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे उपस्थित राहून सादर करावेत, असेही आवाहन प्रसिध्दी पत्रकान्वये श्री. खांदे यांनी केले...
Read Moreशबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत कर्ज योजना; अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगारांनी ऑनलाईन अर्ज भरावेत -हि. न. पाटील
Posted by Ramchandra Bari | Aug 24, 2023 | शासकीय |
नंदुरबार (जिमाका वृत्त): शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी अल्प व्याजदरात 2023-24 या वर्षात कर्ज योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे शाखा व्यवस्थापक हि. न. पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. या योजनेत स्वयंसहाय्यता बचतगट, प्रवासी, मालवाहू वाहन व ऑटोरिक्षा व्यवसाय यासाठी कर्ज मंजूर करण्यात येणार आहे. या योजनेसाठी तहसिलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांचा जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, ग्रामीण व शहरी भागासाठी रु. 3 लाख मर्यादेत उत्पन्नाचा दाखला, व्यवसायासाठी लागणाऱ्या साहित्याचे दरपत्रक, व्यवसाय प्रकल्प अहवाल, बँक पासबुकची छायाकिंत प्रत, सातबारा, घर नमुना आठ, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, तीन पासपोर्ट साईज फोटो, वाहन व्यवसायासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रचलित नियमानुसार आवश्यक कागदपत्रे, एक जामीनदार आदि कागदपत्रे अर्जासोबत सादर करणे बंधनकारक असेल. अर्ज भरण्यासाठी https://mahashabari.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन कर्ज वितरण प्रणालीद्वारे स्वत:चे खाते तयार करुन, संपूर्ण माहिती व आवश्यक ती कागदपत्रे जोडावित. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची मुद्रीत प्रत कागदपत्रांसह शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या शाखा कार्यालयास 5 सप्टेंबर 2023 पर्यंत जमा करावी. असेही प्रसिध्दी पत्रकान्वये श्री. पाटील यांनी कळविले...
Read More