नंदुरबार (जिमाका वृत्त): जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी आपल्या संबंधित ग्रामसेवकाकडे संपर्क साधुन ग्रामपंचायतीत नोंदणी करुन विहित नमुन्यातील ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.

राज्यातील ऊसतोड कामगांराचे व त्यांच्या कुटूंबाचे जीवन अस्थीर व अत्यंत हलाखीचे असते. त्यांचे जीवन सुखकारक, राहणीमान उंचावुन त्यांना विविध कल्याणकारी योजनेचा लाभ देण्यासाठी ऊसतोड कामगाराना ओळखपत्र देण्यात येत आहेत.  जे ऊसतोड कामगार मागील तीन वर्ष  किंवा जास्त कालावधीपासून ऊसतोडणीचे  काम करत आहेत व जे इतर नियमांची पूर्तता करत आहेत त्यांना आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी करुन ओळखपत्र प्राप्त करत येईल, असेही प्रसिध्दी पत्रकान्वये श्री. वसावे यांनी कळविले आले.