Author: Ramchandra Bari

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्त) : इयत्ता 10 वी 12 वी तसेच त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी महाविद्यालयात प्रवेशित असलेल्या अनु. जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास तसेच इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी पात्र विद्यार्थ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यानी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. स्वाधार योजनेच्या अटी व शर्ती मध्ये बदल करण्यात येवुन शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या तथा शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या व योजनेचा लाभ घेवु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांस 50 टक्के गुण असणे अनिवार्य आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांस 3 टक्के आरक्षण असेल तसेच गुणवत्तेची टक्केवारी 40 टक्के इतकी राहील व त्यासाठी त्यांची गुणवत्ता स्वतंत्र तयार करण्यात येईल. या योजनेच्या लाभासाठी सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षात नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी महाविद्यालयात प्रवेशित असलेल्या अनु. जाती व नवबौद्ध घटकातील पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार येथे संपर्क साधावा, असेही श्री. वसावे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले...

Read More

लंपी रोग टाळण्यासाठी पशुंचे लसीकरण करुन घ्यावे – डॉ. उ. दे. पाटील

नंदुरबार (जिमाका वृत्त) : पशुपालकांनी मागील वर्षी लसीकरण न केलेले गाय वर्गातील सर्व निरोगी पशुंना व नवीन जन्माला आलेल्या लहान वासरांना साथीच्या रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी स्थानिक पशुवैद्यकिय संस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. उ. दे पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणच्या जनावरांमध्ये लंपी स्कीन या साथरोग सारखी लक्षणे आढळून येत असून रोग सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होवु नये यासाठी जिल्ह्यातील पशुंचे लसीकरण करण्यात येणार आहे.  पशुपालकांनी आपल्या पशुची लसीकरण करुन घ्यावे व लम्पी चर्मरोगग्रस्त जनावरांची योग्य शश्रुषा करुन मरतुक अवस्था टाळण्यासाठी तसेच आजारी पशुधनावर त्वरीत उपचार करुन लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. सर्व क्षेत्रीय पशुवैद्यकिय संस्था प्रमुखांनी प्रत्यक्ष जनावरांमध्ये सदर रोग सदृश्य लक्षणे आढळणाऱ्या केंद्रबिंदु पासून 5 कि.मी. त्रिज्येच्या वर्तुळात रिंग स्वरूपात लसीकरणास सुरुवात करावी. नंदुरबार जिल्ह्यातील पशूंना रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी पहिल्या टप्यात 1 लाख 52 हजार 100 व दुसऱ्या टप्यात 1 लाख 52 हजार 200 असे एकूण 3 लाख 4 हजार 300 लसमात्रा प्राप्त झाल्या असून या लसींचे क्षेत्रीय पशुवैद्यकिय संस्थाना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गाय वर्गातील पशुधनाच्या संख्येनुसार वाटप करण्यात आले आहे.  जिल्ह्यात आजपावेतो गायी 97059, बैल- 108346 व लहान वासरे 19007 असे एकूण 224412 गोवर्गीय पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. बाधित क्षेत्रात करावयाच्या उपाययोजना लंपी स्किन डिसीज हा गो व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणुजन्य त्वचारोग आहे. ◼️ आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणु गटातील कॅप्री पॉक्स या प्रवर्गात...

Read More

वाहनचालकांसाठी मोफत आरोग्य, नेत्र तपासणी -किरण बिडकर

नंदुरबार (जिमाका वृत्त) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जिल्ह्यातील वाहनचालकांसाठी 24 ऑगस्ट 2023 रोजी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. नंदुरबार शहरातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह, नगरपरिषदेजवळ  सकाळी 10-30 ते दुपारी 4-00 वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील सर्व वाहनचालकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा व आपली आरोग्य व नेत्र तपासणी करुन घ्यावी असे आवाहनही श्री. बिडकर यांनी केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!