शबरी घरकुल योजनेत ‘मागेल त्याला घर’ हे धोरण; जिल्ह्यातील बेघर नागरिकांनी धोरणाचे संधीत रूपांतर करावे ! – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार (जिमाका वृत्त) : शबरी घरकुल योजनेत ‘मागेल त्याला घर’ हे धोरण आदिवासी विकास विभागाने अंगिकारले असून जिल्ह्यातील सर्व बेघ नागरिकांनी या धोरणाचे संधीत रूपांतर करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. ते आज शहादा येथील मीरा प्रताप लॉन्स येथे आयोजित शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या तालुक्यातील प्रातिनिधीक ६६२ घरकुलांच्या आदेश वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, रामचंद्र पाटील डॉ. कांतीलाल टाटीया, जि. प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, प्रांताधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार दीपक गिरासे, गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, नंदुरबारच्या एकात्मिक आदिवासी...
Read More
