Author: Ramchandra Bari

नवापुर तालुक्यात हत्तीरोग नियंत्रणासाठी सामुदायिक औषधोपचार मोहिम सुरु – अपर्णा पाटील

नंदुरबार : (जिमाका वृत्त) नवापूर तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात हत्तीरोगाची समस्या असल्याने तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन औषधोपचार करणार असल्याचे, जिल्हा हिवताप अधिकारी अधिकारी अपर्णा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. नवापूर तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात ही मोहिम सुरु झाली असून 26 ऑगस्ट 2023 पर्यंत ही मोहिम सुरु राहणार आहे. यामध्ये घरोघरी जावून आरोग्य कर्मचारी गोळ्या खाऊ घालणार आहेत. हत्तीरोगाच्या निर्मुलनासाठी सामुहिक औषधोपचार मोहिम आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नवापुर तालुक्यातील 2 वर्षाखालील मुले, गर्भवती स्त्रिया व गंभीर आजारी रुग्ण वगळता सर्वांना गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहेत. शहरी व ग्रामीण भागात शाळा, बसस्थानक, रेल्वेस्थानक येथे बुथ आयोजित करण्यात येतील व सर्व कार्यालये, बँका व इतरत्र घरोघरी जाऊन गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहेत. हत्तीरोग हा बुचेरेरीया बॅनक्रॉफटी या परोपजीवी जंतुमुळे होणारा आजार असुन या आजाराचा प्रसार क्युलेक्स प्रकारच्या डासांमुळे होतो. दुषित व्यक्तिच्या शरीरातील हत्तीरोगाचे जंतु या डासामार्फत निरोगी व्यक्तिच्या शरीरात प्रवेश करतात. नवापुर तालुक्यातील सर्व नागरिकांना एकाच वेळी डी.ई.सी. व अलबेन्डाझॉल गोळ्या खाऊ घातल्यामुळे दुषित आणि वाहक व्यक्तिंच्या शरीरातील हत्तीरोगाचे जंतु मरतात व त्यामुळे निरोगी लोकांना हत्तीरोग होण्याचा धोका टळतो. यासाठी नवापुर तालुक्यातील प्रत्येक पात्र व्यक्तिने आरोग्य विभागाने दिलेल्या गोळ्या खाणे आवश्यक आहे. आरोग्य विभागामार्फत या मोहिमेसाठीचा पुरेसा औषधसाठा, प्रशिक्षण देण्यात आले आहे. शाळांमध्ये जाऊन सदर मोहिमेबाबत जनजागृती करण्यात येत आहे, शहर परिसरात होर्डींग, बॅनर, घंटागाडीद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. नवापुर तालुक्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याने या गोळ्यांचे सेवन करणे...

Read More

पुढच्या पिढीसाठी ‘पाणीदार’ बना ; जलजीवन मिशन चे शिल्पकार बना ! -पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार (जिमाका वृत्त) : पाणी हे अत्यावश्यक बाब आहे. दुर्गम भागात मैलोमैल चालून घरातल्या माता, भगीनी, मुली पाणी आणतात, हे विदारक सत्य पुढच्या पिढ्यांसाठी बदलायचे असेल तर ‘पाणीदार’ बना ; जलजीवन मिशन चे ‘शिल्पकार’ बना, अशी भावनिक साद  राज्याचे आदिवासी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी घातली आहे.  ते जलजीवन मिशन च्या कामांसंदर्भात नंदुरबार तालुक्यातील ग्रामसेवक व सरपंचांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात झालेल्या या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!