Author: Ramchandra Bari

माता व बालमृत्यु रोखण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी उपचारासाठी तत्परता दाखवावी -पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार (जिमाका वृत्त) : जिल्ह्यातील मातामृत्यु आणि त्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक जोखीमेखालील गरोदर माता, आजारी बाळाला वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची तत्परता अंगणवाडी सेविकांनी दाखवावी, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागामार्फत यहामोगी सभागृहात  अंगणवाडी सेविकांसाठी आयोजित ई-आकार डिजीटील कुशल कार्यशाळेत मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यशाळेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, महिला व बालविकास अधिकारी राठोड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व बालविकास अधिकारी आणि अंगणवाडी पर्यवेक्षक  उपस्थित होते.  यावेळी पर्यवेक्षेकांच्या समस्या...

Read More

राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्याचे आवाहन

नंदुरबार : (जिमाका वृत्त) स्वातंत्र्य दिन साजरा करताना वैयक्तिकरित्या वापरण्यात येणाऱ्या राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जाईल याची दक्षता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे. जनतेच्या वैयक्तीक वापरासाठी छोट्या राष्ट्रध्वजाचा उपयोग करण्यात यावा. राष्ट्रध्वज रस्त्यावर वा अन्य ठिकाणी टाकण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वज खराब झाले असतील तर त्याचा योग्य मान राखून ध्वज संहितेतील तरतूदीनुसार नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात यावी.  अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज विक्रीस प्रतिबंध करावा. अशी विक्री होताना आढळल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावे. जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायदा 1971 नुसार कार्यवाही करावी. सर्व शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था आणि महामंडळांनी प्लॅस्टिक ध्वजाच्या वापरास पायबंद घालावा असे परिपत्रकात नमूद करण्यात आले...

Read More

14 ऑगस्ट रोजी नंदुरबार व नवापूर तालुक्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरतीसाठी आक्षरण सोडत

नंदुरबार : (जिमाका वृत्त) नंदुरबार उपविभागातील नंदुरबार व नवापूर तालुक्यातील कोतवाल संवर्गातील साजांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून शासन धोरणानुसार महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी सोमवार 14 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 2.00 वाजता उपविभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारत टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे सोडत काढण्यात येणार असल्याचे अध्यक्ष कोतवाल भरती समिती तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नंदुरबार मंदार पत्की यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. नंदुरबार तालुक्यातील 15 सजामध्ये- करणखेडा, मंगरुळ, ठाणेपाडा, खैराळे, ढेकवद, खामगाव, वाघाळे, वेळावद, पळाशी, पिंपळोद, धानोरा, उमर्दे खु., रनाळा, वैंदाणे व  रजाळे. नवापूर तालुक्यातील 10 सजामध्ये- नवापूर, करंजी बु, धनराट, गडद, नवागांव, विसरवाडी, भरडू, वडफळी, खडकी व डोंग असे एकूण 25 सजांचे कोतवाल पदे रिक्त आहेत. शासन धोरणानुसार रिक्त पदांच्या 80 टक्के पद संख्या भरण्यासाठी साजांची निवड करणे तसेच 80 टक्के रिक्त साजामधुन निश्चित झालेल्या साजांत शासन धोरणानुसार 30 टक्के महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे.  यावेळी नंदुरबार व नवापूर तालुक्यातील संबंधीत गावातील नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही श्री. पत्की यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!