Author: Ramchandra Bari

लग्न किंवा इतर सोहळ्यासाठी पोलीस स्टेशनला कळविणे बंधनकारक

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  मंगल कार्यालय, लॉन्स व इतर सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी होणारे लग्न व इतर समारंभासाठी 5 दिवस आधी स्थानिक पोलीस स्टेशन किंवा स्थानिक स्वराज्य सस्थेला लेखी स्वरुपात कळविणे आणि कोविड-19 च्या अनुषंगाने मार्गदर्शक तत्वाचे पालन करण्याबाबत हमीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी यासंबंधितचे निर्देश दिले आहेत. आयोजक तसेच संबंधित आस्थापना मालकांनी 5 दिवस आधी स्थानिक पोलीस स्टेशन, नगर पालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत यांनी लेखी स्वरुपात कळविणे आवश्यक राहील. घरी होणाऱ्या कार्यक्रमांबाबत देखील आयोजकांनी 5 दिवस आधी  लेखी स्वरुपात कळवून हमीपत्र देणे बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन होत...

Read More

संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी बबन काकडे, महेश सुधळकर, नायब  तहसिलदार आशा सोनवणे आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित...

Read More

पोस्टमास्तर जनरल औरंगाबाद यांचेतर्फे 17 मार्च रोजी डाक अदालतीचे आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :- औरंगाबाद क्षेत्र संबंधित टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची दखल 17 मार्च 2021 रोजी आयोजित केलेल्या डाक अदालतीत घेण्यात येणार आहे. या डाक अदालतीत टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र अशा सेवेबाबतच्या तक्रारींचा समावेश असेल. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार मोहम्मद खदिर, सहाय्यक निदेशक डाकसेवा, पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद यांचेकडे 10 मार्च पर्यंत अथवा तत्पुर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. तक्रार अर्जाचा नमुना www.maharashtrapost.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे पोस्टमास्तर जनरल औरंगाबाद क्षेत्र यांनी कळविले...

Read More

यंत्रमाग घटकांना वीजदर सवलतीसाठी मुदतवाढ

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  राज्याचे वस्त्रोद्योग धोरण 2018-2023 अंतर्गत वस्त्रोद्योग अंतर्गत यंत्रमाग घटकांना  लागू करण्यात आलेल्या वीजदर सवलतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची मुदत  28 फेब्रुवारी 2021 पर्यत वाढविण्यात आली आहे.  वीजदर सवलतीस पात्र यंत्रमाग घटकांनी आयुक्तालयाच्या https://www.dirtexmah.gov.in संकेतस्थळावर अर्ज सादर करणे आवश्यक  आहे.  यंत्रमाग धारकांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज तसेच यंत्रमाग नोंदणी केल्याशिवाय त्यांना वीजदर सवलतीचा लाभ देता येणार नाही असे वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कळविले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!