नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  राज्याचे वस्त्रोद्योग धोरण 2018-2023 अंतर्गत वस्त्रोद्योग अंतर्गत यंत्रमाग घटकांना  लागू करण्यात आलेल्या वीजदर सवलतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची मुदत  28 फेब्रुवारी 2021 पर्यत वाढविण्यात आली आहे. 

वीजदर सवलतीस पात्र यंत्रमाग घटकांनी आयुक्तालयाच्या https://www.dirtexmah.gov.in संकेतस्थळावर अर्ज सादर करणे आवश्यक  आहे.  यंत्रमाग धारकांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज तसेच यंत्रमाग नोंदणी केल्याशिवाय त्यांना वीजदर सवलतीचा लाभ देता येणार नाही असे वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कळविले आहे.