Author: Ramchandra Bari

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 3 मार्चपासून

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009  अंतर्गत कायम विनाअनुदानित, विना अनुदानित व स्वंयअर्थसहाय्यीत शाळांमध्ये (अल्पसंख्याक शिक्षणसंस्था वगळून ) 25 टक्के राखीव जागांसाठी सन 2021-2022 करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 3 मार्चपासून सुरू होत आहे. आवश्यक कागदपत्रे व इतर माहिती https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली असून पालकांनी 21 मार्च 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे. समाजसेवी संस्था, एनजीओ, शाळा व्यवस्थापकानी यांची नोंद घ्यावी, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ.राहुल चौधरी यांनी कळविले...

Read More

शेततळे योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  केंद्र शासनाच्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत प्लास्टिक अस्तरीकरणासह शेततळ्याचे खोदकाम करण्याची योजना राबविण्यात येत असून यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेसाठी शेतकरी अनुसूचित जमातीचा असावा. वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे किंवा अर्जदार दारिद्र रेषेखालील असावा. लाभार्थ्यांकडे एक हेक्टर जमीन व सिंचनाची सोई असावी. अर्जासोबत पासपोर्ट फोटो, जातीचे दाखले, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखले, फोटो, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, यापूर्वी इतर योजनेतून लाभ न घेतल्याचा दाखला, ग्रामसभा ठराव जोडावा. तसेच योजना पूर्ण केल्यानंतर ती टिकवून काळजी घेण्याबाबत तसेच जमीन गहाण ठेवणार, विकणार नसल्याबाबत 100 रु स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र आवश्यक राहील. सदर योजनेसाठी विधवा, परितक्त्या, स्त्रिया, अपंग लाभार्थी यांना प्राधान्य देण्यात येईल. तसा दाखला अर्जासोबत सादर करणे आवश्यक असेल. इच्छुकांनी  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नवापुर रोड नंदुरबार येथे 15 मार्चपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे असे आवाहन प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांनी केले...

Read More

बालविवाह थांबविण्यास बाल संरक्षण कक्षास यश

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव यांच्या सुचनेनूसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष नंदुरबारला मु.मेहुणबारे ता.चाळीसगाव जि.जळगाव येथील अल्पवयीन मुलीचा नंदुरबार जिल्ह्यातील चौपाळे येथील पुरुषाशी होणारा विवाह रोखण्यात यश आले आहे. प्राप्त सुचनेनूसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी, बाल संरक्षण अधिकारी संस्थात्मक गौतम वाघ, यांनी प्रत्यक्ष पालकांची भेट घेऊन त्यांना बालविवाहाचे दुष्पपरिणाम व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 याबाबत माहिती देऊन समुपदेशन केले. पालकांकडून ‘मुलगी जोपर्यंत 18 वर्ष वयाची होत नाही तोपर्यंत तिचा विवाह करणार नाही’  तसेच आवश्यकतेनुसार मुलीस समितीसमोर सादर करण्याचे हमीपत्र लिहून सदर मुलीचा बालविवाह थांबविण्यात आला. यासाठी चौपाळे येथील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, सरपंच,पोलीस पाटील यांनी सहकार्य...

Read More

गाव बाल संरक्षण समितीची कार्यशाळा संपन्न

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):  जिल्हा महिला व बाल विकास विभाग नंदुरबार अंतर्गत जिल्हा बाल कक्षामार्फत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा येथे गाव बाल संरक्षण समितीची कार्यशाळा सहायक प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कार्यशाळेत बाल कल्याण समितीचे अध्यक्ष विठ्ठल कदम यांनी धडगाव, तळोदा व अक्कलकुवा या तीन तालुक्यातील 64 शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापक तसेच कर्मचाऱ्यांना फोस्टर कोअर, दत्तक विधान प्रक्रिया, चाईल्ड लाईन याबाबत मार्गदर्शन केले. बाल संरक्षण अधिकारी रेणुका मोघे यांनी बालकांचे हक्क, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, बाल कामगार व लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण याबाबत माहिती दिली कार्यशाळेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी, सहायक प्रकल्प अधिकारी मनिषा सोळंकी, संजय चौधरी उपस्थित...

Read More

शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळावे म्हणून उर्मिला गावीतांचे प्रयत्न

नंदुरबार – लहानपणी वडिलांना कष्ट करतांना तीने पाहिलेले…कष्ट करूनही पदरात फारसे येत नव्हते….तेव्हा केलेला निश्चय तीने अजूनही कायम ठेवलेला….चितवी येथील कृषी सहायक उर्मिला गावीत कष्टकरी शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळावे म्हणून आजही त्याच निश्चयाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडीत आहे. उर्मिला यांच्याकडे वागदी आणि देवलीपाडा गावची जबाबदारी देखील आहे. शिक्षण कृषि पदविका बारावीपर्यंत झाले असूनही त्यांनी ज्ञानार्जन सोडले नाही. शेतीविषयक पुस्तके, मासिके आवर्जुन वाचत त्या शेतीतील बदलाविषयी जाणून घेतात. नव्या गोष्टींचे प्रशिक्षण घेणेही त्यांना आवडते. म्हणूनच त्यांना शेतकऱ्यांना नव्या तंत्राची माहिती सोप्या पद्धतीने देता येते. सकाळी 8.30 वाजता त्या घरातील कामे आटोपून बाहेर पडतात. दिवसभर तिन्ही गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात....

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!