नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव यांच्या सुचनेनूसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष नंदुरबारला मु.मेहुणबारे ता.चाळीसगाव जि.जळगाव येथील अल्पवयीन मुलीचा नंदुरबार जिल्ह्यातील चौपाळे येथील पुरुषाशी होणारा विवाह रोखण्यात यश आले आहे.

प्राप्त सुचनेनूसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी, बाल संरक्षण अधिकारी संस्थात्मक गौतम वाघ, यांनी प्रत्यक्ष पालकांची भेट घेऊन त्यांना बालविवाहाचे दुष्पपरिणाम व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 याबाबत माहिती देऊन समुपदेशन केले. पालकांकडून ‘मुलगी जोपर्यंत 18 वर्ष वयाची होत नाही तोपर्यंत तिचा विवाह करणार नाही’  तसेच आवश्यकतेनुसार मुलीस समितीसमोर सादर करण्याचे हमीपत्र लिहून सदर मुलीचा बालविवाह थांबविण्यात आला. यासाठी चौपाळे येथील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, सरपंच,पोलीस पाटील यांनी सहकार्य केले.