नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  केंद्र शासनाच्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत प्लास्टिक अस्तरीकरणासह शेततळ्याचे खोदकाम करण्याची योजना राबविण्यात येत असून यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या योजनेसाठी शेतकरी अनुसूचित जमातीचा असावा. वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे किंवा अर्जदार दारिद्र रेषेखालील असावा. लाभार्थ्यांकडे एक हेक्टर जमीन व सिंचनाची सोई असावी. अर्जासोबत पासपोर्ट फोटो, जातीचे दाखले, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखले, फोटो, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, यापूर्वी इतर योजनेतून लाभ न घेतल्याचा दाखला, ग्रामसभा ठराव जोडावा. तसेच योजना पूर्ण केल्यानंतर ती टिकवून काळजी घेण्याबाबत तसेच जमीन गहाण ठेवणार, विकणार नसल्याबाबत 100 रु स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र आवश्यक राहील. सदर योजनेसाठी विधवा, परितक्त्या, स्त्रिया, अपंग लाभार्थी यांना प्राधान्य देण्यात येईल. तसा दाखला अर्जासोबत सादर करणे आवश्यक असेल.

इच्छुकांनी  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नवापुर रोड नंदुरबार येथे 15 मार्चपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे असे आवाहन प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.