Author: Ramchandra Bari

मोलगी-डाब-अक्कलकुवा मार्गावरील वाहतूक 30 जून पर्यंत बंद

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : मोलगी -डाब-अक्कलकुवा मार्गावरील वाहतूक 30 जून 2021 पर्यंत  बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. मोलगी-डाब- अक्कलकुवा रस्त्याचे ( कि.मी 0/00 ते 30/600 रस्ता) रुंदीकरण, छोटे पुल, स्लॅब ड्रेन, संरक्षण भिंत, तसेच वन हद्दीतील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी पुरेशी जागा नसून  रस्ता घाटाचा आहे. मार्गावरील सुरू असलेले काम लक्षात घेता बस,मोठी अवजड वाहने व प्रवासी वाहतूक यासाठी हा रस्ता त्रासदायक व धोकेदायक असल्याने तसेच अपघात होण्याची शक्यता असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मोलगी ते अक्कलकुवा प्रवासासाठी मोलगी-धडगाव-चाँदसैली-तळोदा-अक्कलकुवा तसेच मोलगी-साकलीउमर-सरी-कुवा-खापर-अक्कलकुवा दोन्ही मार्गावरुन वाहतूक वळविण्यात आली...

Read More

विशेष केंद्रीय सहाय्य योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभागामार्फत विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी शेतात सुधारित शेती व भाजीपाला लागवडीसाठी शेडनेट हाऊस उभारणी, आदिवासी उपयोजना क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी अर्थसहाय्य देणे, ट्यूब वॉल व पंपसेट आणि शेतात बोअरवेल करणे या योजना राबविण्यात येत आहेत. योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या  तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या पात्र शेतकऱ्यांनी 25 मार्च ते 8 एप्रिल 2021 या कालावधीत  शासकीय सुट्टी वगळून अर्ज सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी केले...

Read More

वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : 1 ऑक्टोंबर रोजी साजरा करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त केंद्र शासनाकडून एकात्मिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वयोवृध्दांसाठी  कामकरणाऱ्या व्यक्ती व संस्थाना वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील वयोवृध्दांसाठी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या नोंदणीकृत संस्था, व्यक्तींनी अर्ज सादर करावे असे आवाहन आयुक्त, समाज कल्याण नंदुरबार यांनी केले आहे.   संस्था व व्यक्तींनी आपले प्रस्ताव टंकलेखीत करुन सॉफ्ट कॉपीसह 26 मार्च 2021 पर्यंत सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, टोकरतलाव रोड नंदुरबार  येथे सादर करावे. पुरस्कारा विषयी अधिक माहिती  केंद्रशासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या http://socialjustice.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध...

Read More

शहीद दिनानिमित्त अभिवादन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या  प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी बबन काकडे, तहसिलदार उल्हास देवरे आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!