Author: Ramchandra Bari

शनिवार व रविवार जनता कर्फ्यूला प्रतिसाद देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात कोविड-19 विषाणू बाधित रुग्णाची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा नगर पालिका क्षेत्र तसेच अक्राणी नगर पंचायत व अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात  येत्या 15 एप्रिलपर्यंत आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 6 वाजेपासून ते  सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्याचे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले असून जनता कर्फ्युला स्वत:हून प्रतिसाद देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. या क्षेत्रात आठवड्याच्या शनिवारी व रविवारी सकाळी 7 ते  9 वाजेपर्यंत दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास अनुमती राहील. वैद्यकीय सेवा आणि औषध विक्रीच्या आस्थापना,गॅस वितरण सुविधा पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. वरील ठिकाणातील अत्यावश्यक सेवा...

Read More

सर फौंडेशन तालुका समन्वयक यांची निवड

नंदुरबार (प्रतिनिधी):- सर फौंडेशन या शिक्षकांनी शिक्षकांसाठी चालविलेल्या शैक्षणिक चळवळीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक महिला व एक पुरुष अश्या दोन समन्वयकांची निवड करण्यात आली आहे.स्टेट इनोवेशन अँड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र अर्थात सर फाउंडेशन महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य नेटवर्क आहे. शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून सन 2006 पासून हे कार्यरत आहे. या देशातील अग्रगण्य नेटवर्कशी अनेक जण जोडले गेले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षक या नेटवर्कशी जोडला जावा, विद्यार्थी व शिक्षकांच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी, या हेतूने नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक पुरुष व एक महिला समन्वयक निवड करण्यात आले आहेत. शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण कार्याची दखल घेत; ही निवड...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!