नंदुरबार (प्रतिनिधी):- सर फौंडेशन या शिक्षकांनी शिक्षकांसाठी चालविलेल्या शैक्षणिक चळवळीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक महिला व एक पुरुष अश्या दोन समन्वयकांची निवड करण्यात आली आहे.
स्टेट इनोवेशन अँड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र अर्थात सर फाउंडेशन महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य नेटवर्क आहे. शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून सन 2006 पासून हे कार्यरत आहे. या देशातील अग्रगण्य नेटवर्कशी अनेक जण जोडले गेले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षक या नेटवर्कशी जोडला जावा, विद्यार्थी व शिक्षकांच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी, या हेतूने नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक पुरुष व एक महिला समन्वयक निवड करण्यात आले आहेत. शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण कार्याची दखल घेत; ही निवड करण्यात आली आहे. त्यात नंदुरबार तालुक्यासाठी श्री दयानंद विश्वंभरराव जाधव जि प शाळा, वरूळ श्रीमती रोहिणी दिलीप बाविस्कर जि प शाळा राजापूर यांची निवड करण्यात आली आहे. धडगाव तालुका समन्वयक पदी श्री रुपेशकुमाई नागलगावे, जि प शाळा, काल्लेखेतपाडा, श्रीमती जमुना त्रंबक टेंकाळे, जि प शाळा खर्डीपाडा यांची तर अक्कलकुवा तालुक्यासाठी श्री बालाजी माणिकराव केंद्रे जि प शाळा, वण्याविहिर, श्रीमती आशा दिलीप पटेल जि प केंद्र शाळा खापर नं १ यांची निवड करण्यात आली आहे. शहादा तालुक्यासाठी श्री जयवंत वैजनाथराव जोशी जि प शाळा परीवर्धा, श्रीमती प्रीतम भगवान रनाळे जि प केंद्र शाळा मंदाना यांची तर तळोदा तालुक्यासाठी श्री रविंद्र अरुण गुरव नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिर तळोदा , श्रीमती सोनल निंबा बोरसे जि प केंद्र शाळा प्रतापपूर यांची तर नवापूर तालुक्यासाठी श्री जगदीश उत्तम सोनवणे जि प शाळा, दोरपाडा व श्रीमती रजिता यशवंतराव कापडणीस जि प शाळा, जुनी सावरट यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल सर फाउंडेशन नंदुरबार जिल्हा समन्वयक श्री देवेंद्र बोरसे श्री मनोज कारभारी व महिला जिल्हा समन्वयक श्रीमती सुनंदा भावसार यांच्यासह फाउंडेशनचे संस्थापक व राज्य समन्वयक श्री माशाळे सर, राज्य समन्वयक श्री वाघ सर व राज्य महिला समन्वयक श्रीमती हेमाताई शिंदे वाघ यांनी अभिनंदन केले असून, ही निवड सार्थ ठरवाल असा विश्वासही व्यक्त केला आहे.