नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : मोलगी -डाब-अक्कलकुवा मार्गावरील वाहतूक 30 जून 2021 पर्यंत  बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

मोलगी-डाब- अक्कलकुवा रस्त्याचे ( कि.मी 0/00 ते 30/600 रस्ता) रुंदीकरण, छोटे पुल, स्लॅब ड्रेन, संरक्षण भिंत, तसेच वन हद्दीतील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी पुरेशी जागा नसून  रस्ता घाटाचा आहे. मार्गावरील सुरू असलेले काम लक्षात घेता बस,मोठी अवजड वाहने व प्रवासी वाहतूक यासाठी हा रस्ता त्रासदायक व धोकेदायक असल्याने तसेच अपघात होण्याची शक्यता असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

मोलगी ते अक्कलकुवा प्रवासासाठी मोलगी-धडगाव-चाँदसैली-तळोदा-अक्कलकुवा तसेच मोलगी-साकलीउमर-सरी-कुवा-खापर-अक्कलकुवा दोन्ही मार्गावरुन वाहतूक वळविण्यात आली आहे.