नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभागामार्फत विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी शेतात सुधारित शेती व भाजीपाला लागवडीसाठी शेडनेट हाऊस उभारणी, आदिवासी उपयोजना क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी अर्थसहाय्य देणे, ट्यूब वॉल व पंपसेट आणि शेतात बोअरवेल करणे या योजना राबविण्यात येत आहेत.

योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या  तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या पात्र शेतकऱ्यांनी 25 मार्च ते 8 एप्रिल 2021 या कालावधीत  शासकीय सुट्टी वगळून अर्ज सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी केले आहे.