नंदुरबार (प्रतिनिधी ) :- कैलासवासी दिलवरसिंग दादा पाडवी स्मृती संस्था संचलित वेली माता आश्रम शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती सर्वांना व्हावी यासाठी संस्थेचे चेअरमन डॉ. कांतीलाल टाटीया यांनी लिहिलेल्या “ध्यास” गुणवत्ता विकासाच्या या पुस्तिकेचे अनावरण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जे ओ भटकर तसेच नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी डॉ. वनमाला पवार, दैनिक लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी श्री रमाकांत पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
नंदुरबार येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अधिव्याख्याता श्री बी आर पाटील, डॉ. संदीप मुळे, श्री पंढरीनाथ जाधव, अधीक्षिका श्रीमती मीनाक्षी गिरी यांच्यासह प्रशिक्षण संस्थेतील सर्व विषय सहाय्यक आणि पत्रकार व शिक्षकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.