नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): तऱ्हावद-नांदर्डे-वैजाली-भादे शहादा रस्ता प्रजिमा-5 किमी 12/800 नांदर्डे ते वैजाली गावादरम्यान वाकी नदीवरील लहान पुलाचे  पावसाळ्यात पुरामुळे नुकसान झाल्याने या पुलाच्या दुरुस्तीचे काम पुर्ण होईपर्यंत या पुलावरील  वाहतुक बंद  करण्यात आल्याची माहिती जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

बंद कालावधीत या मार्गावरील वाहतूक नांदर्डे पासून शहादाकडे जाणारी अवजड वाहने ही तऱ्हावद-प्रकाशामार्गे जातील तर इतर लहान वाहनासांठी नांदर्डे-करणखेडा-वैजाली या पर्यायी मार्गाने जातील व येतील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.